Header Ads

Header ADS

अमरावती येथील लव्ह जेहाद प्रकरणावर प्रश्नचिन्ह? ती मुलगी एकटीच होती रेल्वे प्रवासात पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती

The-girl-was-alone-on-the-train-traveling-information-of-police-commissioner-Aarti-Singh-a-question-mark-on-the-case-of-love-jihad-at-Amravati-


अमरावती येथील लव्ह जेहाद प्रकरणावर प्रश्नचिन्ह? ती मुलगी एकटीच होती रेल्वे प्रवासात पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती

वृत्त संस्था अमरावती : शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेल्‍या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून त्या युवतीला सातारा पोलिसांच्या मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. सातारापर्यंतच्‍या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.

  बुधवारी रात्री सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवतीला आज रात्री पर्यंत अमरावतीत आणले जाणार आहे. दरम्यान, ही तरूणी बेपत्ता होताच तिच्या मैत्रिणीकडून तिच्याबाबत माहिती घेण्यात आली. एका संशयित युवकाला देखील मंगळवारी रात्री ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्‍यात आली, असे पोलीस आयुक्त म्हणाल्या.

    ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण असून या युवतीला पळवून नेल्याचा आरोप बुधवारी खासदार नवनीत राणा, भाजप आणि हिंदुत्‍ववादी संघटनांनी केल्याने राजापेठ पोलीस ठाण्‍यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ही युवती एकटीच प्रवासात होती. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते. त्यामुळे ही युवती नेमकी कोणत्या कारणामुळे घरून निघून गेली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक चौकशीदरम्‍यान तिने आपण रागाच्‍या भरात घरून निघून गेल्‍याचे सातारा पोलिसांना सांगितले आहे, पण ती अमरावतीत आल्यावरच प्रकरणाचा उलगडा होईल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.