Header Ads

Header ADS

उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जा पण आई-वडिलांना विसरू नका -कुटुंबनायक रमेश पाटील यांचे गुणगौरव सोडत प्रतिपादन

 

उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जा पण आई-वडिलांना विसरू नका -कुटुंबनायक रमेश पाटील यांचे गुणगौरव सोडत प्रतिपादन

उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जा पण आई-वडिलांना विसरू नका -कुटुंबनायक रमेश पाटील यांचे गुणगौरव सोडत प्रतिपादन 

लेवाजगत  न्यूज भुसावळ -गुणवंतांनी अजून शिकून मोठे व्हावे. उच्च पदावर जावे. मात्र शिकून उच्च पदावर गेल्यावर आई-वडिलांना विसरु नये, अशी अपेक्षा भोर लेवा पंचायतीचे कुटूंब नायक रमेश पाटील यांनी व्यक्त केली. रविवारी शहरातील संतोषी माता सभागृहात अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे समाजातील ३५० गुणवंतांचा सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. 

     व्यासपीठावर आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, गिरीश महाजन, चेतन पाटील, श्रेयस इंगळे, महासंघाचे उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवेंद्र वाणी उपस्थित होते. आमदार भोळे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. तर अध्यक्षीय भाषणात कुटुंब नायक पाटील यांनी, कितीही उच्च पदावर गेले तरी आपल्या आई-वडिलांना विसरू नका असे सांगितले. यानंतर दहावी, बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर व विविध विद्या शाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ३५० गुणवंतांचा सत्कार झाला. प्रास्ताविक अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, तर सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी यांनी केले. गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्याम भारंबे, उपाध्यक्ष रूपेश चौधरी व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

    उद्योगधंद्यांकडे वळा...

ऑनलाइन अभ्यासाऐवजी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करुन अधिकारी बना. शिक्षण घेवून दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा उद्योजक होऊन इतरांना नोकरी व रोजगार द्या, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.