Header Ads

Header ADS

रावेर सावदा दरम्यानचे खड्डे श्रीराम फाऊंडेशन बुजवणार

 

रावेर-सावदा दरम्यानचे खड्डे श्रीराम फाऊंडेशन बुजवणार

लेवाजगत न्यूज:-

 बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यान असलेले रस्त्यावरील खड्डे  श्रीराम फाऊंडेशन रावेर अध्यक्ष श्रीराम पाटील हे स्वखर्चातून बुजवणार आहेत बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाचा अहवाल तयार करण्यात येत असून सध्या , सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वादात हा रस्ता अडकला आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासाठीच श्रीराम पाटील यांच्या पुढाकारातून या रस्त्यावरील संपूर्ण खड्डे दिनांक ७ सप्टेंबर रोजी मुरूम टाकून बुजवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

अनेक वेळा खड्डे चुकवताना अपघात होतात. व या अपघातामध्ये वाहन धारकांना अर्धांग वायू व जीव गमवावा लागत असतो बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठी वाहतूक असून अनेक वेळा खड्डे चुकवताना वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे प्रत्येक नागरिकाचे प्राण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी व त्याच्यासाठी अनमोल असा आहे रावेर तालुक्यातील व रस्त्यावर कुणाचाही अपघातात जीवीत हानी होऊ नये यासाठी श्रीराम पाटील हे प्रयत्न करीत आहे. असे त्यांचे संपर्क अधिकारी घनश्याम पाटील यांनी सांगितले दरम्यान त्यांच्या या लोकाभिमुख कामाची संपूर्ण तालुक्यातून मोठी प्रशंसा होत असून त्यांचे कौतुकही केले जात आहे.

दिनांक 7 संप्टेबर बुधवार

सकाळी 9 :30 श्रीराम ऑटो सेंटर पासुन सुरुवात..


सकाळी 10:30 विवरे बु बस स्टॅड

सकाळी 11:00 विवरे खु.बस स्टॅड


दुपारी 12:00 वडगांव बस स्टॅड 


दुपारी 1:00 वा.वाघोदा बस स्टॅड 


  दुपारी 2:30 सावदा 


दुपारी 3:30 वा सावदा रेस्ट हाऊस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.