सर्पदंश झालेल्या महिलेने गमावला जीव; वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप
सर्पदंश झालेल्या महिलेने गमावला जीव; वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप
लेवाजगत न्युज:-सर्पदंश झालेल्या महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना नंदूरबार जिल्ह्यात घडली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. तसंच, रुग्णालय प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ग्रामीण रुगाणलायत सर्पदंश झालेल्या महिलेचा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले होते. काठी गावच्या रहिवाशी असलेल्या २२ वर्षीय निलीमा वळवी यांना साप चावल्यानंतर मोलगी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपस्थित आसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेवर वेळेत उपचार केले नाहीत तसेच पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी महिलेचे नातवाईक आणि ग्रामस्थांनी रात्री ९ वाजल्यापासुन ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. जोपर्यत दोषींवर कारवाई होणार नाही तो पर्यत सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. रात्री दोनच्या सुमासार जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यावर यातील दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत