Header Ads

Header ADS

शेतात फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू

 


शेतात फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू 

लेवाजगत  न्यूज बोदवड -येथील उजनी रस्त्यावरील शेतामध्ये कपाशी पिकावर फवारणी करताना विषबाधा होऊन प्रभाकर रामदास वंजारी (वय ५७)यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

    फवारणीवेळी वंजारी यांनी मळून तंबाखू खाताना त्यांच्या तोंडात फवारणीच्या विषारी औषधाचा अंश गेल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे उलटी व मळमळ होऊ लागल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात आणले. मात्र उपचारापूर्वी तपासणीत त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अरविंद प्रभाकर वंजारी यांच्या खबरीवरून येथील अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.