Header Ads

Header ADS

अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू

  


अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू

लेवाजगत न्युज अहमदनगर : पंधरा दिवसापूर्वी एका संशयित दहशतवाद्याला नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला पंजाब पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. या घटनेनंतर शिर्डीची देशभरात चर्चा झाली होती. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी कलम १४४ लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केला आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यात घरमालक, लॉजमालक, सायबर कॅफेचालक, मालक, मोबाईल सिमकार्ड विक्रेते, प्रिटिंग प्रेस, ऑफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक, भंगार विक्रेते आणि जूने वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. कुणी संशयास्पद किंवा अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणेसह सर्व यंत्रणानी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षता घ्यावी असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

"जिल्ह्यातील घरमालकांनी, भाडेकरुंबाबतची सर्व सविस्तर माहिती, ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय ओळखपत्र फोटोसह स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अहमदनगर पोलीस दलाच्या ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती भरावयास सांगण्यात आले आहे."

 जिल्ह्यातील घरमालकांनी, भाडेकरुंबाबतची सर्व सविस्तर माहिती, ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, शासकीय ओळखपत्र फोटोसह स्थानिक पोलीस स्टेशनला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अहमदनगर पोलीस दलाच्या ahmednagardistpolice.gov.in या वेबसाईटवर सर्व माहिती भरावयास सांगण्यात आले आहे.

लॉज मालकांनी आपल्याकडे येणारे सर्व प्रवाशांची माहिती ओळखपत्रासहित संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर घेऊन त्यांची सविस्तर नोंद आणि सही रजिस्टरला घेऊनच प्रवाशांना लॉज मध्ये प्रवेश द्यावा. तसेच प्रवाश्यांची घेण्यात आलेली सर्व माहिती रेकॉर्ड 2 वर्षांपर्यंत जतन करुन ठेवावे. सायबर कॅफे मध्ये येणारे ग्राहक महिला, पुरुष यांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी.

मोबाईल सिमकार्ड विक्रेत्यांनी, मोबाईल सिमकार्ड विक्री करतेवेळी सिमकार्ड धारकाचे ओळखपत्र आणि फोटो घेऊन सिमकार्ड घेणारा तोच आहे किंवा कसे याची खात्री करावी, तसेच आपले विहित नमुन्यातील रजिस्टरवर त्यांचा फोटो चिकटवून त्यांची इत्यंभूत माहिती नोंदवावी. जेणेकरून सीमकार्डचा दुरुपयोग होणार नाही. यापूर्वी ज्या व्यक्तीचे नावाचे सिमकार्ड आहे. त्याच्या संमतीशिवाय इतर अनोळखी व्यक्ती सिमकार्ड वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार घडू नये म्हणून वितरकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.


तर प्रिंटिंगप्रेस, ऑफसेट चालकांनी आपणाकडे धार्मिक मजकूर छापतेवेळी माहिती प्रकाशित करणाऱ्या व्यक्तिचे ओळखपत्र आवश्यक घ्यावे. त्यात काही आक्षेपार्ह मजकूर छापला जाणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेसमध्ये छापले जाणारे सर्वच निमंत्रणपत्रिका, माहितीपत्रके, बॅनर, भित्तीपत्रके इत्यादी प्रेसचे ठळक नाव छापून मोबाईल नंबर दर्शवावा असं सांगण्यात आलं आहे.

विस्फोटक गोदाम परवानाधारक यांनी विस्फोटक , ज्वलनशील साठा ठेवणे, विक्री, खरेदी करणे याठिकाणी नेहमी विस्फोटक वस्तू सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. देवाण-घेवाण, खरेदी-विक्री करतांना योग्य ते कायदेशीर नियम अटी आणि शर्तीचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.