सावदा येथे LIC ऑफिस समोर विमा प्रतिनिधिंची निदर्शने
सावदा येथे LIC ऑफिस समोर विमा प्रतिनिधिंची निदर्शने
लेवाजगत न्यूज सावदा - दिनांक ५ सप्टेंबर रोजी सावदा येथे भारतीय जीवन विमा निगम च्या ऑफिस बाहेर सर्व विमा प्रतिनिधींनी लियाफी(ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंटस फेडरेशन ऑफ इंडिया) शाखा सावदा संघटनाद्वारे जोरदार निदर्शने केली. त्यात सर्वप्रथम टाटा अँड सन्स चे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने त्यांना सर्व विमा प्रतिनिधीमार्फत श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा प्रतिनिधी यांचे कमिशन कमी करण्याच्या व अन्य निर्णयाविरुद्ध लियाफी संघटनेच्या आदेशानुसार सोमवार हा दिवस ड्राय डे म्हणून पाळण्यात आला. या दिवशी विमा प्रतिनिधी यांनी एकही प्रपोजल ऑफिसला दिले नाही. विमा प्रतिनिधींनी या दिवशी संपूर्ण कामकाज ठप्प ठेवले होते. याप्रसंगी सावदा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ऑफिस समोर जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. व आपल्या प्रमुख मागण्या संघटनेतर्फे ठेवण्यात आल्या.
या प्रमुख मागण्यांमध्ये पॉलिसीधारकांना मिळणारा बोनस वाढलाच पाहिजे, पॉलिसी प्रीमियम वरील जीएसटी मागे घेण्यात यावा, पॉलिसी कर्ज व लेट फी वरील व्याजदर कमी करण्यात यावे, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स व ग्रॅज्युएटी वाढवून द्यावी, विमा प्रतिनिधींना पेन्शन मिळावी, अशा असंख्य मागण्यांची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
यावेळी ही लियाफी संघटनेचे अध्यक्ष पि के चौधरी, उपाध्यक्ष मुकेश घोडके, खजिनदार अविनाश वाघ, सदस्य युवराज आलोने ,दीपक तायडे, समाधान पाटील, किरण कुंभार,आर के पाटील, सतीश भंगाळे, संतोष महाजन ,भारती पाटील, पौर्णिमा चौधरी ,वैशाली चौधरी, रचना अग्रवाल ,रोहिणी महाजन, सुवर्णा महाजन, महेंद्र सोनवणे, लीलाधर नाईक व असंख्य विमा प्रतिनिधी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत