सप्तशृंगी गडावर २६ पासून शारदीय नवरात्र उत्सव मंदिर २४ तास राहणार खुले
सप्तशृंगी गडावर २६ पासून शारदीय नवरात्र उत्सव
मंदिर २४ तास राहणार खुले
लेवा जगत न्यूज कळवण- आदिमाया सप्तशृंगीच्या मूर्ती संवर्धनानंतर आदिमायेचे देशातील सर्वात प्राचीन स्थान म्हणून समोर आलेल्या सप्तशृंगी गडावर २६ सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे .आदिमाया आदिशक्तीचे त्त्रिगुणात्मक अष्टदशभुजेतील अतिशय विलोभनीय तेजरूपाचे दर्शन व्हावे यासाठी नवरात्र उत्सवात यावर्षी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे .त्यामुळे प्रशासन, सप्तशृंगी देवी ट्रस्ट, नांदुरी व सप्तशृंगी गड ग्रामपंचायत ने भाविकांच्या अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास मिणा यांनी केल्या.
देशातील ५१ शक्तिपीठांपैकी अति प्राचीन व स्वयंभू शक्तिपीठ म्हणून समोर येत असलेल्या सप्तशृंगी गडावर २६ सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव तर आठ व नऊ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमा उत्सव होत आहे.
आदिमायेच्या मूर्ती स्वरूप संवर्धनाच्या कामासाठी २१ जुलैपासून आदी मायेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. दोन महिन्यानंतर आता नवरातवाच्या पहिल्या माळेस खुले होऊन भाविकांना आदीमायेचे दर्शन होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या प्रशासकीय तसेच ट्रस्ट व ग्रामपंचायततिच्या नियोजनाबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी गड येथे ट्रस्टच्या चिंतन हॉलमध्ये बैठक झाली.
यात आदीमायेचे प्रकट नवरुपाच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता श्री मीना यांनी सूचना केल्या ते म्हणाले भाविकांना दर्शन सुलभ व जलगतीने व्हावे. मंदिर व परिसरात गर्दीत थोपून राहू नये यासाठी नियोजन करण्यात यावे. यात्रोत्सव काळात स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याचे पाणी ,वीज पुरवठा अधिक गर्दीची संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या बसची संख्या पुलिस बंदोबस्त नेहमीप्रमाणे अतिरिक्त स्वरूपात वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नवरात्र काळात दोन पोलीस उपअधीक्षक,१३पोलीस निरीक्षक ,२७ पोलीस उपनिरीक्षक ,१७० पोलीस पन्नास महिला पोलीस ,१६० गृह रक्षक दलाचे जवान,५० महिला गृह रक्षक दल, राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त असेल. बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड ,तहसीलदार बंडू कापसे, गट विकास अधिकारी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्वस्त ऍड ललित निकम ,कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे, शशिकांत बेनके, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन बावळे आदींसह प्रशासकांच्या विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
खाजगी वाहनांना सप्तशृंगी गडावर असेल बंदी
नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्ता नवरात्रोत्सवात खाजगी वाहतुकीस बंद राहणार आहेत. फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बस भाविका प्रवाशांची वाहतूक करतील स्थानिकांना पास ठेवून खाजगी वाहने गडावर सोडण्यात येणार आहेत. आरोग्य यंत्रणेने गडावरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ट्रस्ट दवाखाना, रामटप्पा आदी ठिकठिकाणी बस स्थानक पायी रस्ता या ठिकाणी भाविकांसाठी उपचार केंद्र उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या.
घाट रस्त्यावरील साईट पट्ट्या खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्त्यावर जेसीबी व क्रेन तैनात करण्याचे ही आदेश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाने भाविक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी नवीन गाड्या वापराव्या तसेच नांदुरी व गडावरील बस स्थानकात नियंत्रण कक्ष व फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना विभागीय वाहतूक नियंत्रकांना करण्यात आली आहे.
सप्तशृंगी गडावर असे असेल नियोजन
भगवती मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहील
नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी बस स्थानक व वाहन पार्किंग
मंदिरात जाण्याचा व बाहेर पडण्याचा असे दोन स्वतंत्र मार्ग
चार डोअर फ्रेम मेंटल डिटेक्टर व बारा हँड मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी
पहिली पायरी येथे नारायण फोडण्यासाठी स्वतंत्र पाच मशीनची व्यवस्था
पहिल्या पायरी जवळ कर्पूर कुंड व अगरबत्ती तसेच तेल अर्पण व्यवस्था
श्री भगवती मंदिर मुख्य प्रवेशद्वार चढत्या व उतरत्या पायऱ्यांच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष
भाविकांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर कार्यान्वित होणार
आरोग्य व्यवस्थेची प्राथमिक उपचार केंद्र २४ तास राहणार सुरू
भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी १५ बाऱ्यांचे नियोजन
अखंडित वीज प्रवाहासाठी दोन जनरेटर उपलब्ध
मंदिरात पूजा साहित्य जमा करण्यास १२ सेवेकरी पूजा विधीसाठी ११ पुजारी फक्त अति महत्त्वाच्या अभ्यंकतांसाठी व्हीआयपी दर्शन पासव्यवस्था
श्री भगवती मंदिरापासून परशुराम बालाजी कडे जाणारा प्रदक्षिणामार्ग बंद
गडाच्या पायथ्याशी सोळा एकरावर वाहनतळ (पार्किंग)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत