Header Ads

Header ADS

समता भ्रातृ मंडळ (पिंपरी चिंचवड, पुणे)वधु-वर सूची नाव नोंदणी २०२२ला सुरवात

Samata-Bhratri-Mandal-Pimpri-Chinchwad-Pune-Bride-On-List-Name-Registration-2022-Start


समता भ्रातृ मंडळ (पिंपरी चिंचवड, पुणे)वधु-वर सूची नाव नोंदणी २०२२ला सुरवात 

लेवाजगत न्यूज पुणे-समता भ्रातृ मंडळ पिंपरी चिंचवड आयोजित विवाहेच्छू वधु-वर सूची साठीची विनामूल्य नांव नोंदणी ऑनलाईन चालू आहे व त्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. 


Online नाव नोंदणी खाली दिलेल्या सूचनेनुसार ⚠️ करता येईल.

www.samatabhratrumandal.com

www.samatabhratrumandal.com

 या वेबसाईट वर जाऊन तिथे “वधु वर मेळावा २०२२”वर क्लिक करा.


  त्यानंतर तुम्ही मंडळाच्या वधु वर सूची नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन पेज वर तुमचा email id नोंदवून एक पासवर्ड सेट करा व मोबाईल नं. टाकावा.


  रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला मंडळातर्फे कन्फर्मेशन SMS येईल. कृपया नोंद घ्यावी की रजिस्ट्रेशन झाल्या नंतर आपणास वधू वरांची संपूर्ण प्रोफाईल भरावयाची आहे.  



  मागील वर्षी देखील फॉर्म भरला असल्यास तुम्ही डायरेक्ट लॉगीन करू शकतात. पासवर्ड आठवत नसल्यास Forgot Password मध्ये email टाकून SUBMIT बटन क्लीक करावे. तुम्हाला त्वरित sms द्वारे पासवर्ड पाठवण्यात येईल.


  पुन्हा रजिस्ट्रेशन पेज वर जाऊन आपले लॉगिन केल्यावर आलेल्या पर्यायांपैकी (वर/वधु/घटस्फोटीत/विधवा/विधुर) योग्य पर्याय काळजीपूर्वक निवडावा. 


 फॉर्म भरतांना जिथे (म) असे लिहिलेले असेल ती माहीती मराठीत भरावी व इतर ठिकाणची माहीती इंग्रजीत भरावी. त्यासाठी सॉफ्टवेअर तुम्हाला space button दाबल्यावर ऑटोमॅटिक मराठी लिहिण्यास मदत करेल.


  फोटो मध्ये उमेदवाराचा चेहरा स्पष्ट दिसायला हवा. सेल्फी अथवा फुल साईज फोटो टाकू नये कारण प्रिंटींग नंतर त्यात चेहरा स्पष्ट दिसत नाही.


  फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर फॉर्म च्या खालच्या बाजूला असलेले SAVE बटन वर क्लिक करावे. व भरलेला फॉर्म पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घेणे.


  फॉर्म मधील माहीती बिनचूक व पूर्ण भरलेली असल्याची खात्री केल्यावर फॉर्म च्या वरील बाजूस असलेल्या  SUBMIT FOR VERIFICATION वर क्लिक करा.


  SUBMIT FOR VERIFICATION वर क्लिक केल्यानंतर फॉर्म मंडळाकडे येईल. त्यानंतर मंडळाकडून फॉर्म चि तपासणी होईल व काही शंका असल्यास फोन येईल.


  नंतर मंडळाकडून फॉर्म APPROVE होऊन तो प्रिंटींग साठी पाठविण्यात येईल.


 आपला फॉर्म एकदा व्हेरीफिकेशन केल्यानंतर आपणास काही गोष्टी बदलावयाचे असल्यास आपण Grievance मध्ये जाऊन Service Request नोंदवू शकतात. मंडळातर्फे त्या गोष्टी बदलवण्यात येतील.        


 आपणास लगेचच ऑनलाईन सूची बघायची असल्यास मंडळाचे Android Application Google Play Store वरून Samata Bhratru Mandal नावाने डाउनलोड करून अल्पदरात सूची पाहता येऊ शकते. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


_https://play.google.com/store/apps/details id=com.dream.samtaBhratruMandal_

_https://play.google.com/store/apps/details id=com.dream.samtaBhratruMandal_

अधिक माहितीसाठी संपर्क करावा Toll Free Number 02071173733


नाव नोंदणीसाठी मंडळ कुठल्याही प्रकारचे नोंदणी शुल्क मागत नाही व आमच्या वेबसाईट वर असे कुठेही विचारले जात नाही याची कृपया नोंद करावी. असे काही आढळल्यास त्वरित मंडळाकडे संपर्क करावा.


वधु-वर सूची २०२२ मिळवण्याबाबत माहिती


वधु-वर सूची २०२२ पुस्तक आत्ता आपण आपल्या घरपोच मागवू शकता.


समता भ्रातृ मंडळ (पिंपरी चिंचवड, पुणे) दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही वधु-वर पुस्तक प्रिंट करणार आहे. ह्या पुस्तकात जवळ जवळ १००० पेक्षा जास्त नावे दरवर्षी असतात. अश्या ह्या बिनचूक सूची चे वितरण दरवर्षी मेळावाच्या १० दिवस अगोदर मंडळाच्या अधिकृत नोंदणी व सूची विक्री केंद्र ह्यांकडे करण्यात येते. मागील ३ वर्षीचा आलेख बघता दरवर्षी सूचीची उपलब्धतते बाबतीत कमतरता मंडळास जाणवते. 

 

म्हणून मंडळ हे दर वर्षी वधु-वर सूची पुस्तक आपल्या घरी  Courier ने मागविण्यासाठीची सुविधा नागरिकांस देण्याची उपाययोजना करत असते.

ह्या वर्षीही मंडळाची उत्तम अशी रंगीत प्रिंट असलेली व बिनचूक सूची आपण ऍडव्हान्स बुकिंग करून व ऑनलाईन पैसे भरून आपल्या घरपोच मागवू शकता व त्यासाठीचे ऍडव्हान्स बूकिंग आमच्या www.samatabhratrumandal.com

www.samatabhratrumandal.com

 ह्या वेबसाईट वर चालू आहे.


चेतावणी


कृपया नोंद करावी कि समता भ्रातृ मंडळ (पिंपरी चिंचवड, पुणे) ह्यांची सूची हि कुठल्याची दुसऱ्या वेबसाईट वर उपलब्ध नाही आणि मंडळ किंवा कोणताही मंडळाचा कार्यकर्ता ह्यास सूचीचे पैसे त्यांच्या स्वतःच्या account वर अथवा GPay, Phonepe किंवा इतर कुठल्याही माध्यमातून स्वीकारण्याची अनुमती मंडळाने दिलेली नाही. असे काही आपणास निदर्शनास आल्यास त्वरित ०२०७११७३७३३ ह्या नंबर वर संपर्क करावा.*


वधु-वर सूची २०२२ ऑनलाईन बघण्यासाठीचे Android Application


Application Name: Samata Bhratru Mandal


वधु-वर मेळाव्यासाठी तयार केलेले समता भ्रातृ मंडळाचे Android Application हे प्रोफाईल शोध व इतर बरेच काही उत्कृष्ट वैशिष्ट्ये असलेले पहिले Application मंडळाने प्रकाशित केलेले आहे. आपली प्रोफाईल मंडळातर्फे खात्री करून मंजूर झाल्यावर मंडळाचे अँड्रॉइड Application Google Play Store वरुन डाऊनलोड करावे व त्यासाठीची फी भरून त्याचा वापर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.