साकळी येथे घरात शिरून महिलेस मारहाण , शिवीगाळ अन् धमकीही
साकळी येथे घरात शिरून महिलेस मारहाण , शिवीगाळ अन् धमकीही
लेवाजगत न्यूज साकळी ( ता.यावल ) येथील सरला गजानन सोनवणे यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली . याबाबत त्यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली .
सरला सोनवणे यांनी वासुदेव केशव वडर यांच्याकडून पैसे घेतले होते . यानंतर वासुदेव वडर याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली . एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली .
याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वासुदेव केशव वडर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस हवालदार सिकंदर तडवी करत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत