पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू
वृत्तसंस्था खारघर- पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला. एकाच कुटुंबातील दोन गटात झालेल्या वादा पोलिसांच्या पर्यंत गेला होता यात एकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले ठेच त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूस पैसे मागणारे पोलीस असल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला तर हे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले होते .
हेही वाचा-शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान
परराज्यात शिकणाऱ्या ओबीसींची शिष्यवृत्ती रद्द- शिंदे सरकारचा निर्णय https://www.lewajagat.com/2022/09/Hundreds-of-Students-Damaged-Shinde-Government-Decision-Cancellation-of-Scholarships-of-OBCs-Study-Abroad.html
कोपरखैरणे पोलीस ठाण्यात झालेल्या एका संशयित व्यक्तीच्या मृत्यूबाबत काही आठवड्या पूर्वीच तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे . रामसिंग चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव आहे रामसिंग चौहान मूळ राहणार अमरावतीचे असून पोटापाण्यासाठी खारघर येथे अनेक वर्षांपासून राहतात त्यांच्याच भावकितील काही लोकांशी त्यांचा वाद झाला यात दोन गट पडले हा वाद एवढा विकोपाला गेला की दोन्ही गटांनी पोलीस ठाणे गाठले या बाबत अदखलपात्र गुन्हा नोंद काम सुरू होते.त्याच वेळी अचानक रामसिंग हे चक्कर येऊन पडले त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याही ठिकाणी इलाज होणे शक्य नसल्याने एम जी एम मध्ये नेण्यात आले तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मात्र पोलिसांनीच केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची दावा नातेवाईकांनी करीत गोंधळ घातला या वर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आलीशिवराज पाटील ( उपायुक्त परिमंडळ दोन) मयत व्यक्तीला चक्कर आली त्यांना त्वरित पाणी देण्यात आले व त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले नातेवाईकांच्या दोन गटातील वाद होते तेथे पोलिसांनी समुपदेशकाची भूमिका घेतली चौहान याच्या मृत्यू बाबत पोलिसांच्या वर केलेल्या आरोपात तथ्य नाही. हे सीसीटीव्ही द्वारेही पटवून देण्याचा प्रयत्न केला. चौहान याच्या शवविच्छेदन नंतर पुढील कारवाई ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत