पाकिस्तानला सुनावले , बढे यांचे गावात कौतुक चिनावल येथील रहिवासी , परराष्ट्र सेवेत कार्यरत
पाकिस्तानला सुनावले , बढे यांचे गावात कौतुक चिनावल येथील रहिवासी , परराष्ट्र सेवेत कार्यरत
लेवाजगत न्यूज चिनावल- चिनावल तालुका रावेर येथील रहिवासी पवनकुमार तुळशीदास बढे ( आयएफएस ) हे ऑस्ट्रियातील भारतीय दूतावासात कार्यरत आहेत . त्यांनी सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला खडे बोल सुनावले . यामुळे गावातील अनेकांनी त्यांचे कौतुक केले . पवनकुमार बढे यांचे वडील विकास बढे हे महापारेषण कंपनीत उपकार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत . पवनकुमार यांचे शिक्षण जळगाव व मुंबईत झाले .
२००९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१० मध्ये ते भारत सरकारच्या विदेश सेवेत रुजू झाली . त्यांची प्रथम नियुक्ती ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे भारतीय दूतावासात झाली होती . त्यानंतर दिल्ली येथील केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयात पंतप्रधानांच्या विदेश दौरे व परराष्ट्र भेटीच्या प्रमुखांच्या भारत प्रसारमाध्यम समन्वय समितीच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी दोन वर्षे नियुक्ती होती . नंतर त्यांना आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेत भारताच्या स्थायी समितीचे प्रथम सचिव म्हणून जिनेव्हा येथील मुख्यालयात सन २०२० पासून तीन वर्षांसाठी कायम नियुक्ती मिळाली . तेथील परिषदेत त्यांनी अभ्यासूपणे भारताची बाजू मांडून पाकिस्तानला खडे बोल सुनावले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत