ड्रोनद्वारे मानवी अवयव रुग्णालयात पोहोचणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा
ड्रोनद्वारे मानवी अवयव रुग्णालयात पोहोचणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा
लेवाजगत न्युज:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या घोषणांमुळे चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी पुण्यात उडत्या बसची योजना आणण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. पुण्यातल्या चांदणी चौकातील वाहतूक समस्येच्या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी यांनी उडत्या बसची आयडिया मांडली होती. आता गडकरी यांनी आणखी एक वेगळी आयडिया मांडली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुलभ करण्यासाठी मानवी अवयवांची वाहतूक करण्यासाठी भारतीय ड्रोन तंत्रज्ञानाचा पहिला नमुना (इंडियन ड्रोन टेक्नोलॉजीचा प्रोटोटाईप) सादर केला.
ड्रोन टेक्नोलॉजीचा प्रोटोटाईप डेव्हलप करणाऱ्यांपैकी एक एमजीएम हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. प्रशांत राजगोपालन म्हणाले की, सध्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा ऑर्गन (अवयव) बॉक्स २० किलोमीटरपर्यंत पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो.
ड्रोन कंपनीसोबत करार
राजगोपालन म्हणाले की, त्यांनी त्यांच्या रुग्णालयातून ऑर्गन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी शहरातील एका ड्रोन कंपनीसोबत करार केला आहे. यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लान्टमध्ये क्रांती घडवण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.
ड्रोनच्या वापरामुळे वेळेची बचत
होईलड्रोनच्या सहाय्याने विमानतळ ते रुग्णालय अशी मानवी अवयवांची ने-आण करण्यासाठी खूपच कमी वेळ लागेल. परंतु सध्या विमानतळावरून रस्त्याने अवयव पोहोचवण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. ड्रोनमुळे ते काम आणखी कमी वेळात करता येईल. तसेच वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल.
गडकरी म्हणाले
गडकरी म्हणाले की, ह्युमन ऑर्गनशिवाय थांबलेल्या किंवा ट्रान्सपोर्ट आणि वेळेचं महत्त्व समजून घेत आपल्याला ऑगर्न्सच्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात इनोवेशन करण्याची आवश्यकता असेल. अशा वेळी ड्रोन हा एक उत्तम पर्याय आपल्यासमोर आहे.
गडकरी म्हणाले की, ह्यूमन ऑर्गनच्या ट्रांसपोर्टेशनची समस्या सोडवण्यासाठी हा एक अतिशय नवीन दृष्टिकोन आहे. संशोधन आणि विकासाचा एक भाग असल्याबद्दल मी एमजीएम हेल्थकेअरचं कौतुक करतो. गडकरी म्हणाले की, चांगले रस्ते आणि हवाई संपर्काद्वारे ऑर्गन ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत