Header Ads

Header ADS

मुक्ताईनगरात आदिवासी वसतिगृहात कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 

Muktā'īnagarāta-ādivāsī- vasatigr̥hāta-karmacāṟyācī- gaḷaphāsa-ghē'ūna-ātmahatyā

मुक्ताईनगरात आदिवासी वसतिगृहात कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर- येथील आदिवासी वसतिगृहातील शिपाई कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली .

 नवीन बाबुलाल गोहर ( वय ५२ ) या कर्मचाऱ्याचे नाव आहे . आत्महत्येची ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली . नवीन याचा भाऊ मनोज गोहर दुपारी वरणगाव येथून मनोज हा भावाला भेटण्यासाठी मुक्ताईनगर येथे आला . नवीन याची पत्नी रंजिता सात दिवसांपासून माहेरी गेली असून नवीन हा घरात एकटाच होता . घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तसेच संपर्क साधल्यानंतरही फोन न घेत नसल्याने मनोज यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला . तेव्हा छताच्या पंख्याला दोरी बांधून नवीन याने गळफास घेतल्याचे दिसले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.