सासू - सुनेच्या नात्यापेक्षा मायलेकींचे नातेच आमच्यात घट्ट भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सासू - सुनांच्या सत्कारा प्रसंगी सुनांनी व्यक्त केले मनोगत
सासू - सुनेच्या नात्यापेक्षा मायलेकींचे नातेच आमच्यात घट्ट भोरगाव लेवा पंचायतीतर्फे सासू - सुनांच्या सत्कारा प्रसंगी सुनांनी व्यक्त केले मनोगत
लेवाजगत न्यूज भुसावळ- कुटुंबात सासूबाईंनी नेहमीच मुलीप्रमाणे प्रेम दिले , शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे आमच्यात सासू सूनेच्या नात्यापेक्षा मायलेकींचेच नाते अधिक घट्ट झाले , असे विचार भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे आयोजित सासू सून सन्मान सोहळ्यात अनेक सुनांनी व्यक्त केले . यावेळी पाच समाजबांधवांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले .
हेही वाचा-समता भ्रातृ मंडळ (पिंपरी चिंचवड, पुणे)वधु-वर सूची नाव नोंदणी २०२२ला सुरवात
संतोषी माता हॉलमध्ये रविवारी ( दि१८ ) सकाळी ११ वाजता आदर्श सासू - सूनांचा सत्कार व जीवन गौरवपुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला.अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश विठू पाटील होते . व्यासपीठावर भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड . प्रकाश पाटील स्वागताध्यक्ष सुहास चौधरी , प्रोजेक्ट चेअरमन आरती चौधरी , सचिव डॉ.बाळू पाटील, संचालक शरद फेगडे, डिगंबर महाजन , मंगला पाटील , परीक्षित बहऱ्हाटे , आर . जी . चौधरी , माजी आमदार नीळकंठ फालक , महेश फालक , विष्णू भंगाळे , बंडू भोळे , वाय.पी.बऱ्हाटे अशोक चौधरी , डॉ . प्रियदर्शनी सरोदे,गीता चौधरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आरती चौधरी यांनी केले.समाजात घटस्फोटाचे वाढते प्रमाण व विभक्त कुटुंबाची कारणे बघता समाजासमोर चांगला आदर्श असावा म्हणून हा सोहळा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. जीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले . भोरगाव पंचायतीमध्ये अगदी किरकोळ कारणावरून पती - पत्नीतील वादाचे प्रकरणे येतात . त्यांनी या सासू - सूनांचा आदर्श घ्यावा , सासू - सुनेत होणारे वाद टाळावे , आणि गुण्या गोविंदाने संसार करावा , असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले . सुत्रसंचलन मंगला पाटील यांनी केले . यावेळी अंजली पाटील,सुनीता जावळे यांनी मनोगत व्यक्त केले .भुसावळ , पाडळसे , गोजोरे , न्हावी , कंडारी , फेकरी, निंभोरा , साकरी , खिरोदा काहुरखेडे , नाडगाव , पिंपळगाव तळवेल , अकोला , ठाणे ,औरंगाबाद, पनवेल , डोंबिवली , जळगाव येथील
३० सासू - सुनांच्या जोड्यांचा सन्मान करण्यात आला . त्यांना साडी , स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले .
यांना जीवन गौरव पुरस्कार भोरगाव लेवा पंचायती भुसावळ शाखेतर्फे अण्णासाहेब पुरुषोत्तम पाटील ( मलकापूर ) ,रमाकांत भारंबे ( गाडेगाव ) , पुरुषोत्तम पिंपळे ( पुणे ) , सरला वारके ( मस्कावद माधुरी चौधरी ( औरंगाबाद ) यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत