मराठी बालसाहित्य क्षेत्रात 'चिमुकले जगत' बालकविता संग्रहाचे आगमन
मराठी बालसाहित्य क्षेत्रात 'चिमुकले जगत' बालकविता संग्रहाचे आगमन
लेवाजगत न्यूज कल्याण- अल्पावधीतच साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे कवितासंग्रह चारोळ्या संग्रह ,कथासंग्रह , मासिके ,लेखसंग्रह ,पाककृती संग्रह अशी विविध प्रकारची 44 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.लवकरच बालसाहित्यात लेखिका व कवयित्री सौ. जया सुधाकर पाटील यांच्या 'चिमुकले जगत' ह्या बालकविता काव्यसंग्रहाचा समावेश होत आहे. खान्देशी कन्या म्हणून ओळख असणाऱ्या कवयित्री सौ. जया पाटील यांचे माहेर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व सासर तळवेल येथील आहे.
साहित्यातील अनेक प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून दिवाळी अंकांसाठी कथा लेखन सुद्धा त्या करतात.मराठी संवर्धन होण्यासाठी मुलांना मराठीची आवड निर्माण करणे गरजेचे आहे ह्या विचारांतून आपण बालकवितांकडे वळलो असे त्या म्हणतात. पुस्तकास ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.श्री.राम नेमाडे ह्यांची प्रस्तावना लाभली असून रंगीत ,चित्रमय आकर्षक पुस्तकाची सजावट मनोमय मीडिया ह्यांनी केली आहे.
ह्या कविता संग्रहाचे प्रकाशन रविवार दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी 'श्री साई हॉल ' वायले नगर, कल्याण(प.) येथे पार पडणार आहे. ज्येष्ठ लेखक श्री. सुनील जावळे, लेखक व संस्थापक ज्ञानवर्धिनी हायस्कूल श्री. किसन वराडे, श्री. योगेश जोशी अध्यक्ष, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान या व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडणार आहे. प्रकाशन सोहळ्यास साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे, मा. नगरसेविका सौ शालिनीताई सुनील वायले, मा. नगरसेवक श्री. सुनिलदादा वायले ,कवी लेखक श्रीकांत पेटकर आणि अनेक मान्यवर साहित्यिक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे औचित्यसाधून निमंत्रित कवींच्या काव्यवाचन सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत