कुंड गावाजवळ सापडलेली मृत महीला व महिलेचे मारेकरी मलकापूरचेच निघाले ! आवाहनात्मक खुनाचा छडा लावण्यास मुक्ताईनगर पोलिसांना अवघ्या काही तासात यश
कुंड गावाजवळ सापडलेली मृत महीला व महिलेचे मारेकरी मलकापूरचेच निघाले !
आवाहनात्मक खुनाचा छडा लावण्यास मुक्ताईनगर पोलिसांना अवघ्या काही तासात यश
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर :-मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर कुंड गावाजवळ असणाऱ्या पूर्णा नदी पात्रावरील पुलाच्या खालील बाजूस २९ ऑगस्ट रोजी जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेह व खुन्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. परंतु दोन दिवसात या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून मृत महिला ही मलपकापुर नगर परिषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके अशी ओळख पटली असून त्यांचा अतिशय क्रुरपणे खून करण्यात आला असून दोघे खुन्यांना पोलिसांनी अटक केली असून खुनाचे कारणही समोर आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, न.प.च्या सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके (वय ६३ ) रा. गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या. २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह पोलिसांनी पुलाच्या वर काढला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरविली आणि मलकापूर पोलिसांची संपर्क साधण्यात आला.
त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापूर शहरात येवून या खूना बाबत माता महाकाली नगर, एसटी बसस्थानक, गणपती नगर व अन्य ठिकाणी चौकशी केली. अखेर त्या अनोळखी महिलेचा मुक्ताईनगर येथे प्लास्टीकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा मलकापूर येथील प्रभा फाळके यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने मलकापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर मृतदेहाची मुक्ताईनगर पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केल्यानंतर त्याच दिवशी २९ ऑगस्ट रोजी मृतदेहावर पोलिसांकडून मुक्ताईनगर येथेच अंतीम संस्कार करण्यात आले असल्याची माहिती मुक्ताईनगर पो.स्टे. चे एपीआय शेवाळे यांनी दिली. याप्रकरणी तपास सुरू असून खुनाचा छडा लावण्यात ही पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या घराशेजारील विश्वास भास्कर गाडे वय( ४८) व भार्गव विश्वास गाडे मलकापूर वय (२४)दोघे रा. मलकापूर या दोन्ही पिता पुत्रास संशयीत म्हणून अटक केली असून दोघानी महिलेस गुंगीचे औषध देवून तिच्या अंगावरील दागिने व काही रक्कम बळकाविण्याच्या हेतुने केल्याची कबुली पोलिसी खाक्या दाखविताच दिली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पो.स्टे. चे एपीआय शेवाळे हे अधिक तपास करीत आहे.
या फोटोतील दोघा पिता पुत्रांना पोलिसांनी अटक केले.
दरम्यान अवघ्या काही तासातच खून झालेल्या महिलेची ओळख पटवून खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश असल्याने मुक्ताईनगर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पथकातील शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, श्री. प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक, श्री. राहूल बोरकर, पोलीस उपनिरीक्षक, पोहेकॉ गणेश मनुरे, पोना संतोष नागरे, पोना धर्मेंद्र ठाकुर, पोना नितीन चौधरी, पोना देवसिंग तायडे, पोना कांतिलाल केदारे, पोकॉ मंगल पारधी, पोकॉ राहूल बेहनवाल, पोकॉ रवि धनगर, पोकॉ मुकेश घुगे, पोना लतीफ तडवी, पोकॉ सुरेश पाटील, मलकापुर शहर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक श्री. राजपुत अशांचे पथकाने अथक परिश्रम केले.
तपासातील घटनाक्रम :
“मलकापुर शहरातील एक महिलेची ओळख पटली त्यावरुन मयत महिलेचा मुलगा रितेश माधवराव फाळके यास विचारपुस केली असता. मयत महिलेचे फोटे पाहिले असुन फोटोतील महिलेचे अंगावरील दागिने मिळून आले नाही. तसेच अंगावरील चैन पट्टी, अंगठी, चप्पल पाहूण ओळखल्या. मयत प्रभा माधवराव फाळके हिचे शेजारी राहणारे विश्वास भास्करराव गाढे यांचे घरी येणे जाणे होते. त्यावरुन त्यांचे मोबाईल फोन क्रमांकाचे सीडीआर, लोकेशन व मलकापुर शरहातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता. भार्गव विश्वास गाढे, विश्वास भास्करराव गाढे हे सतत तिचे संपर्कात असल्याचे दिसून आले. दिनांक १ ऑगस्ट रोजी भार्गव विश्वास गाढे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता. त्याने त्याचे वडील विश्वास भास्करराव गाढे दोन्ही रा. गणपतीनगर भाग-२ मलकापुर ता. मलकापुर जि. बुलढाणा गुन्हा केल्याची कबुली दिले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत