खाकी वर्दीतील पोलिसांना मिरवणुकांत न नाचण्याच्या सूचना
(संग्रहित फोटो)
खाकी वर्दीतील पोलिसांना मिरवणुकांत न नाचण्याच्या सूचना
लेवाजगत न्यूज मुंबई :- गणपती विसर्जनावेळी काही पोलीस खाकी वर्दीत म्हणजे गणवेश घालून नाचतानाच्या चित्रफितीची दखल घेत कोणत्याही पोलिसाने गणवेशात नाचू नये, अशा सूचना राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाने दिल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर भाषण देतानाही दिसून आले आहेत. मुंबई शहर, पुणे आणि कोल्हापूर येथे मिरवणुकीत पोलीस नाचत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर आहेत. तसेच काही ठिकाणी ढोल वाजवत होते. त्यांचे समाज माध्यमांवरील चित्रीकरण चर्चेचा विषय बनले होते.
याची दखल पोलीस मुख्यालयाने दखल घेत पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता बंदोबस्ताला तैनात असताना अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत