मविप्र'ची नियमबाह्य शिक्षणसेवक भरती रद्द
मविप्र'ची नियमबाह्य शिक्षणसेवक भरती रद्द
लेवाजगत न्यूज जळगाव -जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह . समाज मर्यादित जळगावने ( मविप्र ) बेकायदेशीरपणे शिक्षण सेवक भरती काढली होती . ही भरती प्रक्रिया माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ . नितीन बच्छाव यांनी रद्द केली . त्यामुळे खळबळ उडाली आहे . मराठा विद्या प्रसारक संस्थेने शिक्षण सेवक भरतीची जाहिरात एका वृत्तपत्रातून ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे .
दरम्यान , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालयाच्या निर्णयानुसार शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीच्या मार्फत भरण्याचे आदेश करण्यात आले आहेत . त्यामुळे मराठा विद्या प्रसारक संस्थेने दिलेली जाहिरात बेकायदेशीर असल्याचे या प्रकारातून समोर आले आहे . यासंदर्भात त्यांनी तत्काळ वृत्तपत्रातून भरती रद्द केल्याची जाहिरात देऊन खुलासा करावा , अशा आदेशाचे पत्र डॉ . बच्छाव यांनी मविप्र संस्थेच्या मानद सचिवांच्या नावाने काढले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत