युवकांच्या सतर्कतेमुळे तांदलवाडीजवळ पकडला गेला कत्तल करीता वाहुन नेणारा अवैध गुर वाहतुकीचा ट्रक
(मदत करणारे नागरिक)
युवकांच्या सतर्कतेमुळे तांदलवाडीजवळ पकडला गेला कत्तल करीता वाहुन नेणारा अवैध गुर वाहतुकीचा ट्रक video
लेवाजगत न्यूज तांदलवाडी- मध्यप्रदेशातून येणारा व तांदलवाडी जवळून मस्कावद सुनोदा मार्गे मांगलवाडी फाटयावरून हतनूर वरणगाव कडे जाणारा आयशर ट्रक हा गुरे अपुऱ्या जागेत कोंबून कत्तल करीता वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला गेला.
मध्य प्रदेशातून गुरे कोंबून वाहतूक करणाऱ्या ट्रकला (क्र. एम पी. १३ सी ए ९९५० व एम.पी.४१ जी ए. २५५८ या दोन नंबर असलेली आयशर ट्रक) सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील युवकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यास यश आले.
सविस्तर वृत्त असे की सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अवैध गुरे वाहुन नेणारा अवैध वाहतुकीचा ट्रक मांगलवाडी सुनोदा फाटयावर अचानक बंद पडला. यावेळी येथील काही युवक हे व्यायाम करण्यासाठी जात असतांना त्यांना या ट्रकमध्ये मेलेल्या गुरांचा वास आल्याने त्यांना संशय आल्याने ट्रक चालकासह तिघांना हटकले असता, त्या तिघांनी ट्रक तेथेच सोडून पलायन केले. प्रकरणी चालकासह तीन आरोपींना पसार झाले आहेत. यावेळी रावेर पो.निरिक्षक शितलकुमार नाईक, फैजपूर पो.स्टे. चे सिध्देश्वर आखेगावकर, निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पो.नि.काशिनाथ कोळंबे तसेच सावदा राखीव दल कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळली व जमावाला शांत केले. यावेळी ट्रकमध्ये ५० च्या आसपास गुरे असावेत त्यातील मयत २४ गुरे रस्त्याच्या कडेला जेसीबी ने गडडा करून पुरण्यात आले. तर जीवंत गुरांवर आठ ते नऊ पशुवैधकीय अधिकारी टिम उपचारासाठी दाखल झाली होती. यातील जिवंत गुरांना परिसरातील ग्रामस्थ गुरांची परिस्थिती पाहून संवर्धनासाठी घेवून गेल्याचे समजते.
घटनेच्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याचे टॅंकर ग्रा.पं सदस्य शशांक पाटील,जेसीबी किशोर चौधरी यांनी उपलब्ध करून दिले.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,भा ज यु मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,यांचेसह तांदलवाडी,मांगलवाडी,सुनोदा,उदळी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
गुरे वाहून नेण्यासाठी या गाडीत आधी पासून व्यवस्था होती म्हणजेच नियमित वाहतुक करणारी असावी.दाेन टप्प्यात हि व्यवस्था केलेली होती. काही गुरांना पाय व तोंड बांधून अत्यंत निर्दयीपणे बांधले होते.यात गीर जातीचे पूर्ण वाढ झालेले गो-हे,एक वासरी होते.तसेच गुरांना गळ्याला दोर होते म्हणजेच चोरून आणलेले असावेत असा अंदाज नागरिक करीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत