गणपतीतील महाप्रसादावेळी भक्तांमध्ये वाद उफाडल्याने गोळीबार
गणपतीतील महाप्रसादावेळी भक्तांमध्ये वाद उफाडल्याने गोळीबार
वृत्तसंस्था कोल्हापूर : महाप्रसादावेळी भावकीतील वाद उफाळल्याने गोळीबार करण्याची घटना मांढरे (ता. करवीर) येथे घडली. यावेळी दोन गटातील मारहाणी मध्ये पाच जण जखमी झाले आहे असून पोलिसांनाी १२ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. गावात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे .गणेशोत्सवानिमित्तमांडरे येथील हनुमान तरुण मंडळाने शुक्रवारी रात्री महाप्रसादाचे आयोजन केले होते.
परंपरेप्रमाणे महाप्रसाद वाटपावेळी अगरबत्ती लावून, पंक्तीत हातावरून पाणी सोडून जेवणाची सुरुवात केली जाते. त्यासाठी मान ठरलेला आहे. पण भलत्याच व्यक्तीने पाणी सोडल्याने मानापमानाचा वाद उफाळून आला. मंडळातीलच दोन गटांतच रात्री हाणामारीला सुरुवात झाली.उदय सोनबा पाटील यांनी आज करवीर पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,संशयित आरोपी अभिजीत पाटील यांनी बंदुकीचा परवाना नसताना माझ्यावर बारा बोअरच्या बंदुकीने जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली.
मी बाजूला झाल्याने गोळी लागली नाही. त्यांच्या गटाने चिडून जाऊन , शिवीगाळ करून काठीने व दगडाने मारहाण केल्यानेउदय पाटील ,संग्राम पाटील , रंगराव पाटील , अनिल पाटील व रोहित पाटील हे जखमी झाले आहेत.त्यानुसार गावातील अभिजीत सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील , बाजीराव पांडुरंग पाटील , विशाल बाजीराव पाटील , विकास बाजीराव पाटील , दादासो श्रीपती पाटील , प्रकाश शंकर भावके , सर्जेराव शंकर भावके , स्वरूप सुरेश पाटील , राहुल कृष्णात पाटील व तुषार राजाराम पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .करवीरच्या पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून सहायक फौजदार निवास पवार व प्रशांत पाटील यांच्यासहित करवीरच्या पाेलिसांचा बंदाेबस्त मांडरे गावात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत