Header Ads

Header ADS

लंपी (lumpy) साथ रोगामुळे झालेल्या पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी

 

लंपी (lumpy) साथ रोगामुळे झालेल्या पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी 
कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे राज्याचे महसूल व  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन

लेवाजगत न्युज:- जळगांव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनच्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. मुख्यत्वे हा एक संसर्गजन्य रोग असून, तो प्राण्यांनमध्ये जलद गतीने पसरणारा आजार आहे. या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागला असून त्यामुळे पशुधन पालकांना आता आपल्या झालेल्या या नुकसानाची चिंता भेडसावत असून, यासाठी शासनातर्फे पंचनामे होऊन काही आर्थिक मदत मिळावी व गुरांच्या गोठयांमध्ये रोग प्रतिबंधक औषधांची फवारनी करणे व गुरांना तात्काळ लसीकरण करण्यात यावे ही मागणी पशुधन पालकांमार्फत होत होती. ज्याप्रकारे शासनामार्फत लसीकरणाच्या बाबतीत तातडीने पाऊल उचललीत त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनच्या या मागणीबाबतही तातडीने विचार करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तिच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल हरीभाऊ जावळे यांनी १८/०८/२०२२ रोजी जिल्हाधिकारी ,जळगांव ,मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,ना.गिरिषभाऊ महाजन, ना.गुलाबराव पाटील , यांना निवेदन देऊन केली होती. आज पुन्हा राज्याचे महसूल व  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील हे जळगांव जिल्हा दौऱ्या वर आहेत या वेळी पाडळसा येथील स्व.हरिभाऊ जावळे मित्र परिवार तर्फे त्यांना पुन्हा निवेदन देऊन तातडीने मदतीची मागणी केली. मंत्री महोदयांसोबत भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे , खासदार रक्षाताई खडसे ,आमदार संजय भाऊ सावकारे हे उपस्थित होते.


यावेळी हरीभाऊ विचारमंचाच्या वतीने सौ.मिराताई अविनाश तायडे, अविनाश इलेक्ट्रिकल चे संचालक नितीन भाऊ तायडे, योगराज बऱ्हाटे,यशवंत चौधरी व  पदाधिकारी व शेतकरी बंधू उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.