Header Ads

Header ADS

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेर मध्ये स्वागत

 

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेर मध्ये स्वागत


पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेर मध्ये स्वागत

लेवाजगत न्यूज रावेर- तालुक्यातील विवरे खुर्द येथील रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे भारतीय नौदलात पंधरा वर्ष देशसेवा करून आपल्या गावी परतले. त्याबद्दल त्यांचे रावेर येथे जंगी स्वागत करण्यात आले.

https://youtu.be/7WrLrHod24k

मूळचे विवरे खुर्द गावचे रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे जुलै 2007 मध्ये भारतीय नौदलात मेडिकल ब्रांच ला कार्यरत होते. पंधरा वर्ष एक महिने त्यांनी देशसेवा केली. यात चिल्का, हैदराबाद,मुंबई, विशाखापट्टनम,अंदमान निकोबार व कर्नाटकातील कारवार या ठिकाणी त्यांनी देशसेवा  केली.

https://youtu.be/IoZQJYwMSY8

      अनिल डी. गाढे यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण श्री ग.गो. बेंडाळे हायस्कूल,विवरे याठिकाणी केले तर पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण सरदार जी. जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,रावेर येथे घेतले होते. पंधरा वर्ष एक महिन्यांची देशसेवा व कर्तव्यपूर्ती करून अनिल डी गाढे शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी रावेर येथे परतले आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचे औक्षण केले. तसेच रावेर शहर वासियांनी,मित्र परिवाराने त्यांचेवर पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.