3 ऑक्टोबर पासून फेकरी टोल नाका बंद होणार - आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
3 ऑक्टोबर पासून फेकरी टोल नाका बंद होणार - आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
मुक्ताईनगर - राज्य महामार्गावर असलेल्या फेकरी ता. भुसावळ येथील टोल नाका या ठिकाणाहून वाहनधारकांकडून आर्थिक लूट होत असल्याकारणाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ टोलनाका बंद करण्याचे मागणी केली होती पाठपुरावा करून दिनांक 3 ऑक्टोबर 2022 पासून टोल नाका बंद होणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी माहिती दिली.
मुक्ताईनगर कडून जळगाव कडे जाताना फेकरी तालुका भुसावळ येथे व नशिराबाद जळगाव येथे केवळ 30 ते 35 किलोमीटरच्या दोन टोल प्लाजा येतात त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या धोरणामुळे 60 किलोमीटरच्या अंतरात फक्त एक टोल असणे बंधनकारक आहे परंतु वेगळी येथील टोल प्लाजा बंद करण्या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत दाखल घेतली गेली नाही परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांनी 30 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना टोल नाका तात्काळ बंद करण्याचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला व त्याचा वारंवार पाठपुरावा करून दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी बंद होणार आहे असे आमदार चंद्रकांत पाटील यांचे सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी कळविले आहे तसेच फेकरी तालुका भुसावळ या ठिकाणी असलेल्या टोलनाक्यावरून असंख्य वाहनधारकांची दिवसाढवळ्या दूर करण्यात येत होती अशी बाब आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात येतात त्यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा व मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करून टोल बंद झाल्यामुळे नागरिकांमधून सुटकेचा श्वास घेत असल्याची तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांचे एक प्रकारे आभार मानत असल्याचे देखील प्रतिक्रिया येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत