Header Ads

Header ADS

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट वाद्य बंद केल्याने वाद

धानोऱ्यात गणेश विसर्जन  मिरवणुकीला गालबोट वाद्य बंद केल्याने वाद


 धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत उसळली दंगल

वृत्तसंस्था धानोरा (ता. चोपडा) धानोर्‍यात पाच दिवसांची गणेश विसर्जन मिरवणूक ('Shri' Visarjan) शांततेत सुरू असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी (Assistant Police Inspectors) वेळेच्या नावाखाली (name of time) मिरवणुकीत (procession) चक्क लाठीचार्ज (Pretty lathi charge) केल्याने विसर्जन मिरवणुकीला (Immersion procession) गालबोट (Cheeky) लागले. त्यामुळे संतप्त गणेशभक्तांनी ठिय्या आंदोलन (Ganesha devotees protested) सुरु केले. वाद विकोपाला गेल्याने विसर्जन मिरवणुका रात्री ११ वाजता जागेवरच थांबविण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे ठिय्या आंदोलन सुरुच होते. 

    चोपडा तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या धानोऱ्यात आज पाचव्या दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करण्यासाठी विविध मंडळातील गणेशमूर्ती वाद्य वृंदांच्या निनादात विसर्जनाला निघाले होते. प्रशासनाने ठरवून दिलेल्या अकराच्या वेळेत विसर्जन होणार असल्याची अपेक्षा असताना गावातील हनुमान चौकात पोलिस निरीक्षक पी. एल. दांडगे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीतील वाद्य बंद करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनी वाद्य वाजवू देण्याची केलेली विनंती पोलिस निरीक्षक दांडगे यांनी फेटाळून लावत बलप्रयोग करण्यास सुरुवात परिणामी येथील हनुमान चौकात पोलिसविरुद्ध ग्रामस्थ असा वाद उफाळून आला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे मोठ्या प्रमाणावर धावपळ होऊन अनेक महिला भाविक लहान मुले जखमी झाले. पोलिसांच्या लाठी चार्जमध्ये आणि दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जळगावहून अतिरिक्त पोलिस बल रवाना करण्यात आले होते, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी गावात ठाण मानून होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.