मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्यूज सावदा- दिनांक१९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार, २० सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
मंगळवार २० सप्टेंबर २०२२रोजी दुपारी ३ वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने पाळधी, तालुका धरणगावकडे प्रयाण.
दुपारी ३वाजून ४५ मिनिटांनी पाळधी येथे आगमन.
दुपारी ४ वाजता पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा.
सायंकाळी साडे चार वाजता पाळधी येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे प्रयाण.
सायंकाळी ५ वाजून३० मिनिटांनी मुक्ताईनगर येथे आगमन व जाहिर सभेस उपस्थिती.
रात्री सोईनुसार मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण ,रात्री सोईनुसार जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथुन शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत