बकाले याला पोलीस सेवेतून बडतर्फ करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करा -मराठा समाजाची मागणी
बकाले याला पोलीस सेवेतून बडतर्फ करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करा -मराठा समाजाची मागणी
लेवाजगत न्यूज सावदा -स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरण बकाले याने मराठा समाजाविषयी आक्षेपार्य विधान केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. सावदा ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या वतीने फैजपूर विभाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांना निवेदन देत किरण कुमार बकाले याला नुसतं निलंबित करून चालणार नाही तर त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी प्रभाकर महाजन ,कमलाकर पाटील ,अनिल पाटील ,मनोहर येवले ,अमोल पाटील, रितेश मस्कावदे ,बाळू पाटील, निलेश पाटील ,विश्वेश्वर पाटील व अतुल पाटील ,योगेश पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
समता भातृ मंडळ पिंपरी चिंचवड जाहिरात-
निवेदनात म्हटले आहे की किरण बकाले या स्थानिक गुन्हा शाखा जळगाव विभागाचा पोलीस अधिकारी म्हणून एका उच्च पदावर कार्यरत असल्यावर देखील एका विशिष्ट समाजाविषयी बेजबाबदार भाषा वापरून पोलिसी खाकीला डाग लावण्याचे काम केले आहे याच्या काळात जिल्ह्यात मोठे अवैध धंदे बळकावले असून या निमित्ताने याने मोठी अवैध संपत्ती जमा केली असून बकाले याच्याकडे मोठया प्रमाणात अवैद्य संपत्ती आहे. त्यामुळे अशा पोलीस निरीक्षकाला पदावर राहण्याचा कोणताही एक अधिकार नाही व आतापर्यंतच्या याचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासून याने कोणकोणत्या समाजाविषयी असे घृणत्व भाषा वापरली आहे याची देखील चौकशी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत