Header Ads

Header ADS

आमोद्यात भाग्योदय फ्रेंडन्स सर्कल गणेश मंडळातर्फे १५० जणांना कोरोनाचा बूस्टर डोस, सातव्या दिवशी होणार बाप्पाचे विसर्जन

 

Amodayat-Bhagyodaya-Friendship-Circle-Ganesh-Mandal-150-people-will-have-a-corona-booster-dose-on-the-seventh-day-of-Bappa’s-immersion

आमोद्यात भाग्योदय फ्रेंडन्स सर्कल गणेश मंडळातर्फे १५० जणांना कोरोनाचा बूस्टर डोस,

सातव्या दिवशी होणार बाप्पाचे  विसर्जन

लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल-श्रीराम दूध डेअरी भागातील भाग्योदय गणेश मंडळांनी दिनांक ५सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयामार्फत दीडशे जणांना बूस्टर डोस दिले.  तरुण व महिलांचा जास्त सहभाग होता  हिंगोणा येथील  प्राथमिक आरोग्य केन्द्र  अंतर्गत उपकेंद्र आमोदा कर्मचारी आरोग्य अधिकारी डॉक्टर अतुल वायकोळे, आरोग्य सेवक दीपक कुमार दीक्षित, आरोग्य सेविका पल्लवी भारंबे यांनी क्षयरोग पंधरवाडा राबवतांना क्षयरोगाबद्दल सर्वांना माहिती दिली. आशा वर्कर्स नीलिमा चौधरी, सुवर्णा चौधरी, मनीषा बैरागी ,गीता तायडे, वत्सला सपकाळे ,सुषमा पाटील यांनी  भाग्योदय मंडळाचे अध्यक्ष मयूर चौधरी ,यतीश तळेले,वैभव चौधरी ,वैभव तळले,हेमंत तळले ,भूषण चौधरी, धीरज चौधरी, सोनल चौधरी, गुणवंत चौधरी ,गिरीश बाविस्कर, रुपेश कपले, पराग महाजन, यश चौधरी यांनी सहकार्य केले कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला.

              तसेच सातव्या दिवशी नव युवक गणेश मंडळ, भवानी मित्र ,  भाग्योदय फ्रेंड्स सर्कल गणेश , मैत्री चा राजा गणेश , एकता व फ्रेंन्ड गणेश मंडळ सहा  सर्व गणेश मंडळाचे विसर्जन होणार आहे त्यात  पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर व ग्रामपंचायत कर्मचारी  पोलीस पाटील तुषार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत विसर्जन पार पाडणार आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.