Header Ads

Header ADS

आदित्य ठाकरेंच्या ट्विट मुळे चर्चेला उधाण

आदित्य ठाकरेंच्या ट्विट मुळे चर्चेला उधाण



 आदित्य ठाकरेंच्या ट्विट मुळे चर्चेला उधाण 

लेवाजगत न्यूज मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका दाव्याने ही चर्चा पुन्हा रंगणार असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. वेदांता- फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतामधील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतामधील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जाणार आहे.

     शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचे स्क्रिनशॉट शेअर करत ट्वीट केल आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, भारतामध्ये सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय याचा मला आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रामधून हा प्रकल्प बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही निश्चित करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यामध्ये आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी गुजरातमधील सेमीकंडक्टरच्या या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रकल्पामुळे भारताच्या विकासाचा नवा मार्ग सुरू होईल असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्राला देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य तयार करण्याचे प्रयत्न केले होते असेही आदित्य यांनी म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.