महावितरण भरतीमधील उमेदवारांचे उपोषण पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती देण्याची मागणी; राज्य सरकारचे दुर्लक्ष
महावितरण भरतीमधील उमेदवारांचे उपोषण पात्र उमेदवारांना त्वरीत नियुक्ती देण्याची मागणी; राज्य सरकारचे दुर्लक्ष
लेवाजगत न्युज मुंबई:- गुणवत्तेवर निवडलेल्या, कागदपत्रे पडताळणीत वैध ठरलेल्या उमेदवारांना समांतर आरक्षणासहित नवीन यादी प्रसिद्ध करताना भरती प्रक्रियेतून बाद न करता समांतर आरक्षणात पात्र होणाऱ्या उमेदवारांची अतिरिक्त यादी प्रसिद्ध करावी, ऐनवेळी भरती प्रक्रियेच्या नियमात बदल करण्यापूर्वी कागदपत्रे पडताळणी झालेल्या महावितरण विद्युत सहाय्यक भरतीमधील पात्र उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी सोमवारपासून विद्युत सहाय्यक उमेदवारांनी मुंबई आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
उमेदवारांची प्रथम दखल घ्यावी, अंतरिम स्थगिती असलेल्या याचिका निकाली काढाव्यात, पात्र उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यसरकारने महावितरण कंपनीला योग्य कायदेशीर मार्गदर्शन द्यावे, प्रतिक्षा यादीत निवडलेल्या परंतु उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून घेऊन नियुक्त्या द्याव्यात, कागदपत्रे न झालेल्या १४१ अशा आंदोलकांच्या मागण्याभरती प्रक्रिया तीन वर्षांपासून लंबित असल्याने प्रतिक्षा बादीतील पात्र उमेदवारांच्या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व महावितरण व्यवस्थापकीय संचालक यांनी घ्यावी, अशी मागणी विद्युत सहाय्यक उमेदवारांनी केली.
पावसाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले. पण ऊर्जा विभागाच्या सचिव स्तरावरून रती संदर्भात काही झाले नाही. न्यामुळे आंदोलन पुन्हा एकदा सुरू केले, असे आंदोलक रवींद्र नायभाये यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत