Header Ads

Header ADS

आधी सहकाऱ्यांना अभिनंदनाचा मेसेज; मग पोलिसाची पत्नी, लेकीसोबत बाराव्या मजल्यावरून उडी


 आधी सहकाऱ्यांना अभिनंदनाचा मेसेज; मग पोलिसाची पत्नी, लेकीसोबत बाराव्या मजल्यावरून उडी

लेवाजगत न्युज अहमदाबाद:-पोलीस हवालदारानं पत्नी आणि मुलीसह आत्महत्या केल्याची घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. तिघांनी बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवलं. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. कुलदीप सिंह असं पोलीस हवालदाराचं नाव असून त्याच्यासोबत त्याची पत्नी रिद्धी आणि तीन वर्षांची मुलगी आकांक्षी यांनी जीवन प्रवास संपवला.

रिद्धी यांनी सर्वप्रथम १२ व्या मजल्यावरून उडी घेतली. त्यानंतर कुलदीप यांनी लेकीसह उडी मारल्याचं सोसायटी वास्तव्यास असलेल्या लोकांनी सांगितलं. रिद्धी यांनी उडी मारल्यानंतर १० सेकंदांत कुलदीप यांनी सोलासह उडी घेतली. फॉरेन्सिक अहवालातील माहितीनुसार कोणीच कोणाला धक्का दिला नाही. तपासातून आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण आत्महत्येचं आहे. मात्र तिघांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

दाम्पत्यानं कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलीस निरीक्षक एन. आर. वाघेला यांनी व्यक्त केली. कुलदीप यांचा फोन तपासला जाणार आहे. कुलदीप यांनी त्यांच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना आत्महत्येपूर्वी व्हॉट्स ऍपवर मेसेज केल्याचं समजतं. सहकाऱ्यांना ग्रेड पेचा लाभ मिळेल त्याबद्दल आनंदी असल्याचं कुलदीप यांनी या मेसेजमध्ये म्हटल्याचं कळतं.

पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नुकतीच निधीची घोषणा केली. पोलीस आणि त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी ५५० कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटेल यांनी ही घोषणा केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.