मंडळ कार्यकर्त्यांकडून महापौर यांच्या घरावर दगड फेक ४३ जणांवर गुन्हा दाखल
मंडळ कार्यकर्त्यांकडून महापौर यांच्या घरावर दगड फेक ४३ जणांवर गुन्हा दाखल
लेवाजगत न्यूज जळगाव -गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक व वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली काल रात्री दरम्यान घडली आहे. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरून परिसरात महापौर महाजन यांचे निवासस्थान आहे. मिरवणूकीच्या दरम्यान एका गणपती मंडळाची मिरवणूक महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकला. हे त्यांच्या कुटूंबियांच्या लक्षात येताच कुटूंबांच्या महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला. मात्र काही संतप्त कार्यकर्त्यांनी महापौर महाजन यांच्या घरातील सदस्यांना मारहाण करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. असा आरोप जयश्री महाजन यांनी केला आहे.
महापौरांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या घटनेत पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचे म्हटले आहे. जर शहराच्या प्रथम नागरिकच या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल ही जयश्री महाजन यांनी उपस्थित करून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे. या घटने संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
महापौरांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात ४३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गुलाल उधळण्याच्या कारणावरून काल मध्यरात्रीच्या सुमारास एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आणि घरावर दगडफेक केल्याचा आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत