26 व्या विश्व अध्यात्मिक संमेलनाची 13 सप्टेंबर पासून सुरुवात
26 व्या विश्व अध्यात्मिक संमेलनाची 13 सप्टेंबर पासून सुरुवात
लेवाजगत न्यूज सावदा-सावन कृपाल रुहानी मिशन आणि वर्ल्ड कौन्सिल ऑफ रिलिजनस चे अध्यक्ष संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या पावन सानिध्यात 26 व्या विश्वअध्यात्मिक संमेलनाचे आयोजन 13 ते 18 सप्टेंबर 2022 ला कृपाल बाग,संत कृपाल सिंह मार्ग, दिल्ली - 9आणि 19 ते 20 सप्टेंबर 2022 ला संत दर्शन सिंह जी धाम, बुराड़ी, दिल्ली मध्ये आयोजन केले जात आहे.
8 दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये ध्यान अभ्यासातील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अध्यात्मिक गुरु परम पूजनीय संत राजिंदर सिंह जी महाराजांचे दिव्य प्रवचन ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे.
संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मानवतेच्या कल्याणाकरिता 13 सप्टेंबर 2022 ला 58 व्या रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन कृपाल बाग मध्ये केले जाणार आहे. संमेलनाच्या सकाळच्या सत्रामध्ये दररोज ध्यानाभ्यासाची कार्यशाळा लावली जाईल, ज्यामध्ये ध्यानभ्यासाची पद्धती तसेच त्या संबंधित सर्व पैलूंविषयी विस्तार पूर्वक समजाविले जाईल.
13 सप्टेंबरला संमेलनाच्या उद्घाटन सत्रात रुहानी मुशायरा आणि 14 सप्टेंबरला 'दर्शन- दिव्य प्रेम आणि करुनेचे मसीहा' या विषयावर सेमिनार व आध्यात्मिक प्रवचनांचे आयोजन सुद्धा कृपाल बाग मध्ये केले जाईल.
26 व्या विश्व आध्यात्मिक संमेलनाचे समापन पत्र 20 सप्टेंबर 2022 ला संत दर्शन सिंह जी धाम, बुराड़ी, मध्ये आयोजित केले जाईल . इथे लक्ष देण्यास योग्य गोष्ट ही आहे की 20 सप्टेंबर जो की संत राजिंदर सिंह जी महाराजांचा जन्मोत्सवाचा दिवस आहे, तो पूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय ध्यानाभ्यास दिवसाच्या रूपात साजरा केला जातो. विश्व अध्यात्मिक संमेलनाचे आयोजन समस्त मानवजाती मध्ये अध्यात्माच्या माध्यमातून प्रेम,शांती आणि मानव एकतेचा प्रचार-प्रसार करण्याकरिता केले जाते.
या संमेलनात भारतातील प्रमुख धर्माचाऱ्यांबरोबरच अनेक धार्मिक नेता संमेलना करिता संबोधन करतील. या व्यतिरिक्त विश्वातील अनेक देशांत ज्यामध्ये अमेरिका,कॅनडा,जर्मनी व इंग्लंडचे विभिन्न प्रतिनिधी विश्वशांती, बंधुभाव व आंतरिक शांती वर आपले विचार प्रकट करतील.
संमेलनात भारतातील हजारो लोकां व्यतिरिक्त विश्वातील विभिन्न देशांतील जवळपास 800 प्रतिनिधी भाग घेत आहेत. जर आपण संमेलना संबंधित अधिक माहिती प्राप्त करू इच्छित असाल तर +91-11-27117100 नंबर वर फोन करू शकता किंवा मिशनच्या वेबसाईट www.sos.org वर सुद्धा जाऊ शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत