Header Ads

Header ADS

मुलीच्या वाढदिवसाला शालेय साहित्य वाटप; खान्देश नारीशक्ती चा स्तुत्य उपक्रम

मुलीच्या वाढदिवसाला शालेय साहित्य वाटप; खान्देश नारीशक्ती चा स्तुत्य उपक्रम


मुलीच्या वाढदिवसाला शालेय साहित्य वाटप; खान्देश नारीशक्ती चा स्तुत्य उपक्रम

लेवाजगत  न्यूज फैजपूर - वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं ते जोरदार सेलेब्रेशन, केक कापून एकमेकांच्या तोंडावर फासणे, डिजे लावून पार्टी वैगरे. असे बरेचदा आपल्या सभोवती वाढदिवस होतांना दिसत असतात. परंतु आपली मुलगी १७ मधून १८ व्या वर्षात पदार्पण करत असतांना तिचा जन्मदिवस हा काहीतरी समाजोपयोगी उपक्रम राबवून व विद्यार्थ्यांसोबत साजरा करावा अशी योजना मनाशी आखून फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा व भाजपा कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी मुलगी गुणेश्री च्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत शालेय साहित्य वाटप करुन आगळा वेगळा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवला आहे.

         आपल्या विविध सामाजिक उपक्रमांनी समाजसेवेत अग्रेसर असलेल्या खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी या नेहमीच आदर्शवत कार्य करत असतात. मुलगी वयाच्या १८ व्या वर्षात पदार्पण करत असतांना तिला तिच्या वाढदिवसाला शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करुन एकप्रकारे तिला सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचे बक्षीस  दिले असल्याची भावना यावेळी त्यांनी बोलून दाखवली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका साळुंके मॅडम यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले.

        याप्रसंगी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, मुख्याध्यापिका साळुंके मॅडम, देवेंद्र झोपे,कुमारी गुणेश्री झोपे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.