Header Ads

Header ADS

वाकड लेवा पाटीदार समाज तर्फे ३सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Wakad-Lewa-Patidar-Society-organization-of-blood-donation-camp-on-September-3


वाकड लेवा पाटीदार समाज तर्फे ३सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

लेवाजगत  न्यूज वाकड -येथील लेवापाटील समाजाचे दिनांक ७ ऑगस्ट रोजी पहिले गेटटुगेदर मोठ्या ठाटात पार पडले . लगेच आपल्या पुढच्या वाटचालीला वाकड पुणे येथील लेवा पाटीदार समाज कोअर कमिटी यांनी जोरदार सुरवात केली आहे.

     येत्या ३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे FeverCare, छत्रपती चौक, वाकड येथे सकाळी ८-३०ते दुपारी २ वाजे दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. 

      पुण्यात इन्फेक्शन चा वाढता प्रादुर्भाव बघता डॉ पियुष चौधरी यांनी तत्परतेने समाज बांधवाना फ्लू Vaccine घेण्यास आवाहन केले आहे जे विशिष्ठ सवलती मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

     परिसरातील समाज बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

    दिनांक १३ ऑगस्ट रोजी डॉ. अशोक चौधरी, श्री. गौरव भंगाळे, श्री. निलेश धांडे, श्री. धनंजय राणे यांनी डॉ. पियुष चौधरी यांची भेट घेऊन संपूर्ण शिबिराची रूपरेषा आखली.

    संपूर्ण समाज बांधवांकडून डॉ. पियुष चौधरी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

    नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी श्री. मुकेश येवले, श्री. आकाश भंगाळे, श्री. विवेक चौधरी, श्री. चंदन महाजन, श्री. गिरीश भारंबे, श्री. निखील चौधरी, श्री. पराग धांडे, सौ. रक्षा चौधरी, सौ. स्मिता कोल्हे यांनी आपली पसंती दर्शवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.