Header Ads

Header ADS

सावदा परिसरात वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई , ३० ग्राहकांचे वीजमीटर जप्त, ४१ वीज चोरांविरुद्ध कारवाई ४८ तासात दंड न भरल्यास फौजदारी गुन्हे

सावदा परिसरात वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई ,

३० ग्राहकांचे वीजमीटर जप्त, ४१ वीज चोरांविरुद्ध कारवाई ४८ तासात दंड न भरल्यास फौजदारी गुन्हे 

लेवाजगत न्यूज सावदा-शहर व ग्रामीण भागात मीटर मध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.गेल्या आठवड्याभरात  ३० ग्राहकांची वीज जोडणी कापून मीटर जप्त करण्यात आले आहे . तसेच विविध कलमानव्ये४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

या कारवाईने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

   महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता श्री गोरक्षनाथ सपकाळे यांचे आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता श्री राजेश नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली वीज चोरी विरोधी धडक मोहीम पथकात सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योगेश चौधरी, सागर डोळे, योजना चौधरी, हेमंत चौधरी , मंगेश यादव , सचिन गुळवे, प्रसन्न साळुंखे व कर्मचारी यांचा समावेश होत. 

सावदा विभागातील  ज्या ज्या भागात विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी वीजचोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत ५० युनिट पेक्षा कमी वापर असलेले एकूण २३२ ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली असून फेरफार असलेले ३० मीटर जप्त करण्यात आले व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे .सावदा शहर ०५ , सिंगनूर १० , वाघोदा बुद्रुक ०६ , चिनावल ०६ , निंभोरा ०४, खिरोदा ०४,  गाते ०२ , कोचुर ०३, बलवाडी ०१,

       घरगुती , व्यावसायिक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये, अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता श्री राजेश नेमाडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.