बसस्थानक परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा विविध राज्यातील महिला ताब्यात
बसस्थानक परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा विविध राज्यातील महिला ताब्यात
लेवाजगत न्यूज नंदुरबार -शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दूध डेअरीजवळ कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा घातला. तेथे वेगवेगळ्या राज्यांमधून पैसे घेवून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या १०पिडीत महिला आढळल्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.
नंदुरबार शहरातील बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जुनी दूध डेअरीजवळ दोन महिलासह इतर काही पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांचेकडून अनैतिक व्यापार करून गैरकायदेशीर कुंटणखाना चालवीत आहेत, शाळेकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर वाईट परिणाम होत होता. सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाली होती.
त्याअनुषंगाने काल नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आदेशानुसार कुंटणखान्यावर कारवाई करीत दोन महिलासह इतर काही पिडीत महिलांकडून पैसे घेवून त्यांचेकडून अनैतिक व्यापार करत असल्याचे दिसून आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली.तेथे वेगवेगळ्या राज्यांमधून पैसे घेवून अनैतिक व्यापार करण्यासाठी आणलेल्या १० पिडीत महिला मिळून आल्या.
न्यायालयात हजर करणार
संशयित आरोपीविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज कुंटणखाना चालविणाऱ्या दोन संशयित महिला आरोपी व १०पिडीत महिलांची जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे सविस्तर वैद्यकीय तपासणी करून दोन महिला आरोपी व १० पिडीत महीलांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
त्यानंतर न्यायालयाचे आदेशान्वये १० पिडीत महीलांना धुळे येथील ममता महिला गृह येथे पाठविण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली. नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत काही हॉटेल व लॉजवर अशाच पद्धतीने देह व्यापार सुरू असल्याची चर्चा आहे. याठिकाणी पोलीस कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत