मस्कावद येथे ' लंपी स्कीन'पाहणीसाठी आयुक्त एस पी सिंग व सि ई ओ यांची भेट
मस्कावद येथे ' लंपी स्कीन'पाहणीसाठी आयुक्त एस पी सिंग व सि ई ओ यांची भेट
प्रतिनिधी सावदा-येथील मस्कावत सिम. खुर्द व बुद्रुक भागात लंबी स्किन डिसीज या संसर्गजन्य आजाराचा गुरांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने येथे दोन बैलांचा मृत्यू झाला असून अनेक गाई बैल वासरे लंपी आजाराने ग्रस्त असल्याने पशुपालक रंडकुंदा झाला आहे. आज दिनांक २७ रोजी पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य एस पी सिंग तसेच जिल्हा परिषद सीईओ डॉक्टर पंकज आशिया यांच्यासह टीमने लंबी बाधित जनावरावर औषध उपचार बाबत मार्गदर्शन केले.
यावेळेसपशु संवर्धन आयुक्त एस पी सिंग यांनी मृत्यू झालेल्या पशुपालकांची भेट घेऊन तसेच बाधित झालेल्या पशुपालक यांची भेट घेऊन लंपी या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन औषध उपचार करून स्किन या संसर्गजन्य आजाराचा नायनाट करावा असे सांगून लंबी आजारावर रोगांची लक्षणे व उपाय योजना यांचे मार्गदर्शन केले. यावेळेस पशुपालक सुजित वसंत यशवंत पाटील ,रत्नाकर पाटील, केशव सरोदे,निळकंठ चौधरी, संदीप चौधरी, विकास पाटील, रितेश वारके,सुधाकर पाटील,ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील,मस्कावद बुद्रुक सरपंच पाटील. किरण फेगडे, विक्रम वारके. दीपक पाटील. यांच्यासह अतिरिक्त अतिरिक्त पशुसंवर्धनआयुक्त डॉक्टर परकडे, सीईओ डॉक्टर पंकज आशिया, पशुवर्धन उपायुक्त शामकांत पाटील, जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉक्टर शिसोदे, डॉक्टर निलेश राजपूत सावदा. डॉक्टर धांडे खिरोदा. प्रादेशिक उपयुक्त नासिक डॉक्टर नरवाडे, अधिकारी वर्ग उपस्थित होते. गुरांवर आलेल्या लांबी स्कीन डिसीज या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असल्याने लंबी स्क्रीन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील डॉक्टर हजर असून लंबी आजाराची लक्षणे दिसण्या अगोदर गोठ्याची स्वच्छता. गोठ्यात जंतुनाशक फवारणी तसेच दोन गुरांमधील अंतर ठेवावे तसेच लक्षणे दिसतात पशुवैद्यकीय अधिकारी संपर्क करावा असे आहवान करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत