Header Ads

Header ADS

गुलाबराव पाटील विरोधात शिवसेना आक्रमक स्त्रीरोगतज्ञ बाबद वादग्रस्थ वक्तव्य भोवले

 

Lingayat-saint-rapes-two-minor-girls

गुलाबराव पाटील विरोधात शिवसेना आक्रमक 

  स्त्रीरोगतज्ञ बाबद वादग्रस्थ वक्तव्य भोवले 

लेवाजगत  न्यूज जळगाव -स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात सोमवारी दुपारी शिवसेनेतर्फे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. पाटील यांच्या निषेधाचे लिहिलेले फलक जाळून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांच्या निषेधाचे फलकही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकले.

    शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला आघाडीच्या मंगला पाटील, मनिषा पाटील, युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडिया,अमित जगताप यांच्यासह शिवसैनिकांचा आंदोलनात समावेश होता. रविवारी जळगाव शहरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी डॉक्टरांचे डोके एका फॅकल्टीचे असते. आम्ही जनरल फिजीशियन आहोत. एक हजार जणांची ओपीडीचा निकाल दोन तासात लावला.

  मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे आहेत.स्त्रिरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होवू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबाबत प्रतिक्रया उमटत आहेत. सोमवारी दुपारी शिवसेनेतर्फे मनपासमोर मंत्री पाटील यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. गुलाबराव यांच्या फोटोवर फुली मारलेले निषेधाचे फलक शिवसैनिक घेऊन आले होते. त्याचप्रमाणे शिवसैनिकांच्या हातातही त्यांच्या निषेधाचे फलक होते. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांनी माफी मागावी,अशी मागणी करण्यात आली. पाटील महिलांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचा आरोपही शिवसेनेतर्फे करण्यात आला. यावेळी शिवसेनेतर्फे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

   निषेधाचे फलकही जाळले...

   आंदोलनादरम्यान सोबत आणलेले मंत्री पाटील यांच्या निषेधाचे फलक शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले. ते फलक पायदळी तुडवण्यात आले. त्यानंतर ते फलक जाळूनही टाकण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर शिंदे गटात गेलेल्या आमदारांविरोधात शिवसेना अधिक आक्रमक झालेली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्यात तोडीस तोड उत्तर देण्यात येत आहे. आक्रमकपणे आंदोलने करण्यात येत आहेत. त्यामुळे शिवसेना व शिंदे गट संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.