नव्या अभ्यासक्रमात अयोध्येतील राममंदिरावर धडा
नव्या अभ्यासक्रमात अयोध्येतील राममंदिरावर धडा
नवी दिल्ली:- देशामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तररुदींनुसार एनसीईआरटी नव्या अभ्यासक्रम तयार करत असून त्यामध्ये अयोध्या येथे बांधण्यात येणार्या राममंदिरावर एक धडा असणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते स्वातंत्र्यवीर सावरकर, नामदार गोपाळ कृष्ण गोखले तसेच भारताचे पोलादीपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती सांगणाऱ्या धड्यांचाही धड्यांचे समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. आता मंदिराचे महती पाठ्यपुस्तकाद्वार विद्यार्थ्यांनाच्या मनावर बिंबविण्याचा मोदी सरकारचा विचार असल्याचे कळते.
नव्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असावा यासंदर्भात विचार करण्याकरिता एनसीआरटी समित्या नेमणार आहे. त्या समित्यासमोर आम्ही या सर्व गोष्टी मांडणार आहोत, असे शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारे यांनी सांगितले.
उत्तम संस्कार आवश्यक
शिक्षा बचाओ आंदोलन समिती या संस्थेचे पदाधिकारी व शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होणे आवश्यक आहे. काही आदर्श उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवले पाहिजेत. रामजन्मभूमीचा वाद सुरू होऊन त्यावर तोडगा निघेपर्यंत सुमारे पाच शतकांचा काळ गेला. हा सर्व इतिहास विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसारच अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास कोठारी यांनी व्यक्त केला.
संचालकांनी सांगितले की..
एनसीआरटीचे संचालक डॉ.ऋषिकेश सेनापती यांनी 'लोकमत' ला सांगितले की, नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षापर्यंत तयार केला जाईल.
----------------------
त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा यावर विचारमंथन सुरू आहे. अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या राममंदिरावरही या अभ्यासक्रमात एक धडा असेल.
----------------------
अभ्यासक्रम तयार झाला की, पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल.
----------------------
2005 सालानंतर देशात विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमच तयार करण्यात आला नाही. नवीन अभ्यासक्रम बनवण्यासाठी समित्या नेमल्या जातील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत