Header Ads

Header ADS

कुसुंबा येथे स्व.हरिभाऊ जावळे यांच्या निधीतील भव्य गणपती मंदिर व सभागृहाचे भूमिपूजन

 

कुसुंबा येथे स्व.हरिभाऊ जावळे यांच्या निधीतील भव्य गणपती मंदिर व सभागृहाचे भूमिपूजन

 सावदा प्रतिनिधि:-कुसुंबा गावात गणपती मंदिरासाठी नियोजित असलेल्या जागेवर मंदिर व सभागृह बांधण्यासाठी गिरीश पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांच्याकडे पाठपुरावा केला मा . स्व.हरिभाऊ नी तत्काळ मंजुरी दिली व पुढील प्रक्रिये साठी प्रकरण पाठवण्यात आले पण दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ यांचा पराभव झाला पण पराभव होऊन सुध्धा त्यांनी प्रकरण सोडले नाही वेळी वेळी फोन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि प्रकरण निकालास आणले पण दुर्दैवाने जून महिन्यात हरिभाऊ यांचे निधन झाले त्यांच्या निधननंतर ते काम पूर्णत्वास यावे म्हणून स्व.हरिभाऊ यांचे सुपुत्र श्री अमोल हरिभाऊ जावळे यांनी काम हाती घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आज अयोध्येत होत असलेल्या श्री मंदिर भूमिपूजनाचा योग साधून कुसुंबा येथे गणपती मंदिर आणि सभागृह यांचे संत मंडळी यांच्या हस्ते भूमिपूजन पारपडले तरी त्या कामास कुठलाही अडथळा येऊ नये व ते काम पूर्णत्वास यावे यासाठी हरिभाऊ यांचे सुपुत्र श्री अमोलभाऊ जावळे यांनी काळजीने लक्ष घालून हे काम पूर्णत्वास यावे म्हणून प्रयत्न केले व त्याच बरोबर फैजपुर चे मा . नगराध्यक्ष पिंट भाऊ राणे ,हिंगोणा येथील कुणाल कोल्हे , संदीप पाटील यांनी प्रयत्न केले.आज हरिभाऊ यांची खूप आठवण आली या क्षणाचा आनंद घेण्यासाठी ते आपल्यात असायला हवे होते पण दुर्दैवाने ते आपल्यात नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.