प्रामाणिक-लेखक अनिल कानडे
प्रामाणिक-लेखक अनिल कानडे
" प्रामाणिक " हा एकच शब्द जीवनात
मिसळला तर समजा जीवनाची धन्यता
साधली .
प्रामाणिक्ता म्हणजे काय - तर सतआचरण .
याचा गर्भीत अर्थ - या सत आचरणा द्वाराच
त्या अंतीम सत्या पर्यंत पोहचणे . त्याची
अनुभूती घेणे . हेच "सत्य " बाकी सर्व मोह
व माया . म्हणजेच नाशवंत - आणि आपण
जीवनाच्या प्रत्येक क्षणी मोह व मायेच्याच
पाठीमागे धावत असतो . सत आचरणाने
कळते नित्य अनित्य . मग बोध होतो .
अमोलीक जातेवय आतातरी धरी सोय -
असाकाय नरदेह येईल पुन्हा बा ।
विषयाचे सुख द्वाड येथे लागे बहुगोड - .
मन आता निश्चित पणे मोहातून काढावे
पूर्ण मायेला राम राम करावे . व फक्त कर्तव्य
कर्म निष्काम भावाने करावे - याने पुर्णतया -
आत्मशांती लाभेल .
हेच जीवनाची अंतीम कमाई आहे . हे
कमवत असतांना - जेही आपल्या सांन्नीध्यात
येतात - त्यांच्यावरही सत चा परिणाम होतो .
आपल्या सहवासात त्यांनाही मानसीक समाधान
प्राप्त होत असते .
एखादा मनुष्य जर आपल्या कडे काही समस्या ;
मनोकामना घेवून जरी आला तरी तो - आपल्या
सतभाव युक्त वागण्याने प्रभावीत होतोच . व ज्या
कारणाने आपल्या कडे तो आलेला असतो ; ते
कारण बाजुला सारतो व समाधानाचा धनी होतो .
अस शुद्ध पवित्र - सत आचरणाचा आपल्याला
तर फायदा असतोच ; पण त्यामुळे अनेकांनाही
जीवनात समाधान प्राप्त होते .
हाच " प्रामाणिक " पणात आत्मशांतीचा फायदा
आहे . या साठी मी नेहमी सांगतो - भौतीक्ता व
आध्यात्मिक्ता यात आपण - आध्यात्मिक्ते पासून
भौतीक फायदा किती - अश्या पद्धतीने आपण प्रत्येक
विचार करतो . पण तस न होता या भौतीक
जीवनाद्वाराच आम्हाला आध्यात्मिक प्रगती
साधावयाची आहे . प्रथम हा विचार परिपक्व कसा
होईल - याचा विचार हवा . तरच पुढच्या आध्यात्म
मार्गाची दिशा दिसेल .
पण निरंतर भौतीक सुखासाठीच आपण आध्यात्माचा
सहारा घेत असतो . व हेच आपल जिवनाच ध्येय
झालेल असत . ( (यामुळे आध्यात्माच सत ज्ञान आपल्या
पचनी पडत नाही ) ) . आणि या कारणास्तवच शेकडा ९०
टक्के पुस्तके ( ज्यांना आपण आध्यात्मिक पुस्तके म्हणतो )
अमुक संकट निवारण ; शांती प्राप्ती होईल ; लक्ष्मी प्राप्ती
अशीच बहुतेक पुस्तके प्राप्त होतील . पण सतभाव ; प्रेमभाव
निष्कामभाव ; सत आचरण अशी पुस्तके ठरावीकच मिळतील .
काय सांगणार - . . .. . . .
एकच - आध्यात्म ज्ञान प्राप्त करण्याचा एकच मार्ग तो
म्हणजे - " प्रामाणिक पणा " हीच आध्यात्माची प्रथम पायरी
आहे . याने पुढे सतमार्ग दिसत जातो .
या मार्गानेच मनुष्य आत्मशांतीचा अधिकारी होतो .
प्रामाणिक पणाच्या नाम साधनेतच भगवंत राजी होतात .
नाही तर देवा माझ भल कर - यात देव भल करतो - पण
देव नाही भेटत . म्हणजे - सतसुख ; समाधान ; आत्मशांती ;
आत्मबोध कुठल्याच जन्मी प्राप्त नाही होत . वासनेतच
आपण नित्य अडकल्याने - पाठीमागे - निय भय व चिंता
उभ्या असतातच .
भय व चिंता नष्ट करायच्या असल्या तर फक्त एकच
मार्ग - प्रामाणिक पणे भगवंताचे होवून राहणे ॥ 👏
🌹🌷🙏 राम कृष्ण हरी 👏🌷🌹
अनिल कानडे - ८४५९९९१८४०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत