अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजनाची तयारी होत असतांना भालोद गावात आनंदउत्सव साजरा करण्यात आला
अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजनाची तयारी होत असतांना भालोद गावात आनंदउत्सव साजरा करण्यात आला
भालोद प्रतिनिधि:- भालोद ता:-यावल गावात दि.४/०८/२०२० रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजनाची तयारी होत असतांना भालोद गावातील रामभक्तांनी राममंदिरात दिव्यांची रोशनाई केलेली आहे मंदिराचा संपूर्ण परिसर दिव्यांनी न्हाऊन निघालेला आहे. तसेच गावातील तरुण रामभक्तांनी पंचवटी चौकात फटाके फोडून आनंद व्यक्त करून श्री रामाचा जय घोष करण्यात आला. मंदिरात ग्रामस्थानीं प्रभू श्री रामांची आरती आणि भजने म्हणत मंदिरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध करून या करोना महामारीच्या काळात एक नवीन आशेचा किरण आणण्यासाठी प्रभू श्रीराम प्रार्थना केली. या वेळी सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
याच बरोबर येथील पंचवटी चौकातील श्रीराम मंदिरा मध्ये 5 रोजी सकाळी आठ ते नऊ अभिषेक व सकाळी नऊ ते दहा श्री राम रक्षा व श्री हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत