विनवणी-लेखक राजेंद्र चौधरी
विनवणी-लेखक राजेंद्र चौधरी
आई - बाबा जरा माझ्यासोबतही
बोलायला वेळ थोडा काढा ना
तुम्ही दोघही त्या मोबाईलवर
सतत बोलत असतात
माझ्याकडे मात्र दुर्लक्ष करीत असतात
मी कळवळीची विनवणी करतो तुम्हाला
जरा प्रेमाने माझ्याशी ही बोला ना
आई - बाबा जरा माझ्यासोबतही
बोलायला वेळ थोडा काढा ना ll १ ll
तुमचा तो मोबाईल तुम्हाला
माझ्यापेक्षा जीवलग वाटतो का?
मी जरा त्याला हात लावला तर
आपण मला रागवतात का?
माझ्यापेक्षाही तो मोबाईल तुम्हाला
एवढा महत्त्वाचा वाटतो का?
थोडा माझाही विचार करा ना
आई - बाबा जरा माझ्यासोबतही
बोलायला वेळ थोडा काढा ना ll २ ll
केविलवाण्या नजरेने व अपेक्षेने
दररोज मी तुमच्याकडे मोठ्या
आशेने बघत असतो
काल नाही बोललात तर किमान
आज तरी आपण माझ्यासोबत बोलणार
अशी आशा दररोज बाळगत असतो
तरी देखील मोबाईलचा तुमचा
मोह मात्र कमी होत नसतो
जरा मायेने मलाही जवळ घ्या ना
आई - बाबा जरा माझ्यासोबतही
बोलायला वेळ थोडा काढा ना ll ३ ll
मी तुमच्या वंशाचा दिवा आहे
ताई दिव्यातील ज्योत आहे
तरीही आमच्या भवितव्याकडे
तुमचा मात्र कानाडोळा होत आहे
आज आम्हाला तुमच्या
मार्गदर्शनाची फार गरज आहे
उद्या,उद्या तुम्हीही म्हातारे होणारच आहे
मी पुन्हा कळवळीची विनवणी करतो तुम्हाला
काहीच नकोय मला
तो मोबाईल जरा बाजूला ठेवा ना
आई - बाबा जरा माझ्यासोबतही
बोलायला वेळ थोडा काढा ना ll ४ ll
राजेंद्र चौधरी.
रोझोदा.ता.रावेर
मो.९४२३४७२७६५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत