Header Ads

Header ADS

शिवीगाळ करून शस्त्राचा धाक दाखविणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात...

शिवीगाळ करून  शस्त्राचा धाक दाखविणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात...

नवी मुंबई - सोसायटी सदस्यांना शिवीगाळ करून शस्त्राचा धाक दाखविणाऱ्या
दोन इसमांना कोपरखैरणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, आकाशगंगा को. ऑप. हौसिंग सोसायटी, प्लॉट क्र.
१५, से.क्र. २३, कोपरखैरणे, नवी मुंबई गेटसमोर अर्टिगा गाडी पार्क केलेल्या इसमाला गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून त्याने आकाशगंगा को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या सभासदांना शिवीगाळ व दमदाटी
करून तेथून जाऊन पुन्हा त्याचा अनोळखी साथीदारासह मोटार सायकल वरून सोसायटीच्या गेटसमोर व आवारात येऊन सोसायटीतील कार्यकारिणीतील
सभासदांना शिवीगाळ करून दुसर्या इसमाने त्याच्याजवळील पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.