Header Ads

Header ADS

सावद्यात नगरसेवक अपात्रता युद्ध सुरू

  

सावद्यात नगरसेवक अपात्रता युद्ध सुरू

सावदा प्रतिनिधि:- दि .७- सत्ताधारी गटाचे गटनेते ,भाजपा नगरसेवक अजय भागवत भारंबे यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे .अशी तक्रार अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी गट नेते तथा नगरसेवक फिरोज खान पठान ,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक  राजेश वानखेडे , सिध्दार्थ बडगे अशा चार नगरसेवकांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल केली आहे .

     यामुळे सत्ताधारी भाजपा  विरुद्ध , अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नगरसेवक पद अपात्रता  युध्द पेटले आहे .

यापूर्वी तीन महिन्या पूर्वी  सत्ताधारी भाजप गटनेते अजय भारंबे यांनी अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे  पदाचा दुरुपयोग केला या कारणाने नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे  केली आहे . त्या तक्रारीची सुनावणी जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात भारंबे व चौधरी  दोन्ही नगरसेवक एकमेकांच्या रडार वर आहेत .पदाचा गैरवापर केल्याने दोघांनी एकमेकांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्याने शहरात चर्च्या आहे .

  

     परिणामी गटनेते नगरसेवकाने पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्याचे समोर आले आहे .- 

      सविस्तर वृत्त  असे की , येथील गटनेते , नगरसेवक अजय भारंबे हे सन २०१६ पासून नगरसेवक आहेत .त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे .त्यांचे वडील  यांचे नावावर असलेली एकत्रित कुटुंबनुसार सावदा न पा कडे भू अभिन्यास मंजूर केलेला आहे .भू - अभिन्यास मंजूर करताना त्यांनी नगरपरिषदेला   १०० रूपयांचे स्टॅमपेपर वर  लेखी लिहुन दिलेले  सदरच्या भु - अभिन्यासामध्ये मी गटारी चे बांधकाम करून देईल   स्टॅमपेपर  माझे वारसदार जबाबदार राहतील .असे लिहून दिलेले आहे .सदरील भु - अभिन्यासावर १० लाखाच्या वर वसुली रक्कम असून संबंधित मालकाने नगरपरिषद  कडे जमा करावी म्हणून न पा मुख्याधिकारी यांनी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत . त्यानुसार भु - अभिन्यास मालकाचा मुलगा अजय भागवत भारंबे नगरसेवक आहे . तो सत्ताधारी गटाचा असल्याने आजपावेतो नगरपालिकेची थकबाकी भरण्यास तयार नाही . त्यामुळे या जमिनीवर न पा चे नाव लावण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी कर - अधिक्षकांना दिलेला आहे . त्यामुळे यावरून सिद्ध होते की , अजय भारंबे यांनी पदाचा दुरूपयोग केलेला आहे . तसेच अजय भारंबे हे नगरसेवक आहेत व वडील भागवत अवसु भारंबे यांनी एकत्रित कुटुंब पध्दतीने एकत्र अलेली सावदा शिवारातील जमीन गट नंबर १३१ / पार्ट हे नोव्हेंबर २०१९ पासून न पा हद्दवाढीत समाविष्ट झालेली आहे . सदरील जमिनीवर भु - अभिन्यास मंजूर करते वेळी ओपन स्पेस मोकळी जागा व रस्ते दाखविण्यात आले आहे . परंतू या ओपन स्पेस जमिनीवर शेतीची पेरणी करून उत्पन्न घेण्यात येत आहे . त्यामुळे पीता पुत्रांनी संगनमत करून ओपन स्पेस व रस्ताची जागा हडप केल्याचा आरोप केला आहे . नगरसेवक भारंबे यांनी पदाचा गैरवापर करून जागा हडप केल्यामुळे त्यांनी पदाचा दुरूपयोग केलेला असल्याने त्यांना अपात्र करण्याची लेखी तक्रार केली आहे . 

  शहरातील पालिका निवडणुकीला सव्वा वर्ष बाकी असून या एकमेकां विरुद्ध असलेल्या तक्रारीचा काय निकाल लागतो बाबद  शहरातील नागरिक चर्चा करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.