Header Ads

Header ADS

पिंपरी चिंचवड मध्ये ९६० बाधित रुग्णांची नोंद

 

पिंपरी चिंचवड मध्ये ९६०  बाधित रुग्णांची नोंद

 सावदा लेवाजगत वृत्त:-आज  दि.७ ऑगस्ट २०२० रात्री ८.१० वाजता आलेल्या अहवालात  पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेली आकडेवारी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतची असून आजची बाधित रुग्ण संख्या ९६० , शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या  ०९.

 तर आज पर्यंत  एकूण २७,०७८ कोरोना बाधित रुग्ण आहे.

     एकूण मयत ५६६ , तसेच शहरातील एकूण मयतांची संख्या ४६० असून  शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या १०६ आहे.तर आजची  मयत संख्या २१ आहे.

आज मृत झालेले रुग्ण विकासनगर रहाटणी (स्त्री ६५ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६० वर्षे), मोरवाडी (पुरुष ६२ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष ५२ वर्षे), थेरगाव (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ४९ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ६५ वर्षे), मोशी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ७४ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६४ वर्षे), दापोडी (स्त्री ७० वर्षे), रुपीनगर निगडी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ४५ वर्षे), दिघी (पुरुष ७० वर्षे), बिजलीनगर (स्त्री ६५ वर्षे), नेहरुनगर (पुरुष ७५ वर्षे), शिरुर (पुरुष ३६ वर्षे), नारायणगाव (पुरुष ८५ वर्षे), चाकण (पुरुष ४४ वर्षे, स्त्री ३५ वर्षे), येरवडा (पुरुष ७४ वर्षे) येथील रहिवासी आहेत

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE😷आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.