Header Ads

Header ADS

मोफत अन्नधान्याचे वाटप स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत करण्यात येणार पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


 
मोफत अन्नधान्याचे वाटप स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत करण्यात येणार पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
              जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 5 - अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना माहे जुलै ते सप्टेंबर, 2020 चे धान्य एकत्रितपणे मिळणार होते. परंतु आता नवीन निर्देशानुसार या महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
         माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या मासिक नियतनाबरोबरच 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे प्रति लाभार्थी अतिरिक्त मोफत अन्नधान्याचे वितरण तहसिलदार यांनी मंजूर केल्यानुसार स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.