Header Ads

Header ADS

मंदिर - मशिदीच्या लाऊडस्पीकरवर भरते मुलांची शाळा , अक्कलकोटमधील शिक्षकाचा अनोखा उपक्रम

  

मंदिर - मशिदीच्या लाऊडस्पीकरवर भरते मुलांची शाळा , अक्कलकोटमधील शिक्षकाचा अनोखा उपक्रम ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुलांसाठी शोधला नामी उपाय

 (सोलापूर प्रतिनिधी)करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या संपूर्ण जग कासवाच्या गतीने चालत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी डिजीटल माध्यमाद्वारे मुलांचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. एकीकडे डिजीटल इंडिया बनण्याच्या दिशेने देश वाटचाल करत असताना, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुरेशा सोयी-सुविधांअभावी शिक्षणाला मुकत आहेत. परंतू हाडाचा शिक्षक या सर्व गोष्टींवर मात करुन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरुच ठेवतो. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बादोले गावातील के.पी.गायकवाड माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या मयुर दंतकाळे या शिक्षकाने गावातील मंदीर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याचा उपक्रम हाती घेत, मुलांच्या अभ्यासात खंड पडणार नाही याची काळजी घेतली आहे. या विशेष उपक्रमाबद्दल लोकसत्ता ऑनलाईनने दंतकाळे यांच्याशी संवाद साधला.


करोना प्रादुर्भावामुळे राज्यात अद्याप शाळा बंद आहेत. शहरातील पालक आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप, स्मार्टफोन अशा सोयी उपलब्ध करुन देतात. परंतू ग्रामीण भागात आर्थिक परिस्तिती बेताची असलेल्या पालकांना या काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. चित्रकला, मराठी, हिंदी हे विषय शिकवणाऱ्या मयुर दंतकाळे व इतर शिक्षकांना मुलांचं होणारं नुकसान लक्षात येतं होतं. सुरुवातीला शाळेतील शिक्षकांनी गावातील मुलांचा सर्वे करत किती जणांकडे Whats App ची सुविधा असलेला स्मार्ट फोन आहे याचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात फक्त ९० मुलांकडे स्मार्टफोन असल्याचं दंतकाळे यांना समजलं. काही मुलांच्या पालकांकडे फक्त कॉलिंगची सुविधा असलेला तर काही मुलांच्या पालकांकडे फोनच नव्हता. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये याकारणासाठी गावातील मंदिर आणि मशिदीच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना धडे शिकवायचे ही कल्पना दंतकाळे यांना सुचली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.