महावितरण जामनेर विभागास शिवसेना युवसेना तर्फे वीज प्रश्नी दिले निवेदन
महावितरण जामनेर विभागास शिवसेना युवसेना तर्फे वीज प्रश्नी दिले निवेदन
(जामनेर प्रतिनिधी):- शहरातील वीजबिल संबंधी भरपूर समस्या असल्याने त्या मुळे त्या संबंधी जामनेर विभागाचे मुख्य अभियंता यांना शिवसेना युवासेना यांचे वतीने आज निवेदन देण्यात आले
सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरातील वीजबिल संबंधी भरपूर समस्या व तक्रारी असल्याने मुळे
ग्राहकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, शहरामध्ये टाळेबंदी च्या काळातील चालू महिन्याचे मोठ्या प्रमाणात विजबील आल्यामुळे लोक वीज बिलाच्या रकमे नि हैराण झाले आहे,खाजगी ठेकेदार रिडींग घेऊन जातात,चालू महिन्याचे रिडींग विजबील यात तफावत आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन करून वीजबिल तयार करणाऱ्या खाजगी कंपनी वर अधिकारी यांनी लक्ष ठेवून खबरदारी घ्यावी.
शासनाच्या आदेशानुसार विजबील आकरणी होत नसल्याने थकबाकी विजबिला वर व व्याज आकारणी करू नये. विजबील भरण्यासाठी मुदत द्यावी.चालू विजबिलांमध्ये 30% सवलत द्यावी . विजबिलाच्या तक्रारी निवारण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापित करावा जेणे करून नागरिकां च्या समस्या सोडवल्या जातील या करिता महावितरणचे मुख्य अभियंता याना शिवसेना युवासेना तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी अँड भरत पवार मा.युवासेना उपजिल्हाप्रमुख, जळगाव. श्री सुधाकर शेठ सराफ मा.शहरप्रमुख जामनेर,विशाल लामखेडे युवासेना तालुकाप्रमुख. अतुल भाऊ सोनवणे,ज्ञानेश्वर जंजाळ,भूषण ललवाणी,महेंद्र बिराडे,सुरेश चव्हाण,दिपक धुमाळ,ज्ञानेश्वर राठोड,प्रमोद सुरळकर,मिलिंद साळुंखे,व तसेच तक्रारदार हजर होते व शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत